हृषीकेश गुजर यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:16+5:302021-06-26T04:22:16+5:30
दापोली : दापोली शिवसेनेचे युवानेते हृषीकेश गुजर यांची मराठी विद्या प्रसारक मंडळाच्या मराठा मंदिर या प्रशालेच्या शालेय समिती चेअरमनपदी ...
दापोली : दापोली शिवसेनेचे युवानेते हृषीकेश गुजर यांची मराठी विद्या प्रसारक मंडळाच्या मराठा मंदिर या प्रशालेच्या शालेय समिती चेअरमनपदी निवड झाली आहे. या वेळी विजय दळवी, कृपा घाग, दिलीप बेलोसे, विनोद दळवी आदी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष सुनील दळवी यांनी स्वागत केले.
गरजूंना धान्य वाटप
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथे मुंबईस्थित असलेल्या पोंक्षे मंडळींनी गावातील गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. श्री सूर्यनारायणाच्या मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिनाचे औचित्य साधून ही मदत देण्यात आली. गावातील ५० कुटुंबांना दीड महिना पुरेल इतके अन्नधान्य वाटप करण्यात आले. या वेळी सतीश पोंक्षे, विलास पोंक्षे, हनुमान पोंक्षे, जयंत पोंक्षे आदी उपस्थित होते.
नाचणे येथे वृक्षारोपण
रत्नागिरी : शहराजवळील नाचणे शाळेत वटपाैर्णिमेचे औचित्य साधून ग्रामपंचायत सदस्य शुभम सावंत यांच्या संकल्पनेतून उपसरपंच नीलेखा नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी बदामाची रोपे लावण्यात आली. वृक्षाराेपण कार्यक्रमासाठी पदवीधर शिक्षक दीपक नागवेकर, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील सुपन उपस्थित होते.
अन्नपदार्थ टेस्टिंग मोहीम
रत्नागिरी : जिल्ह्यात अन्न आयुक्त यांच्याकडून आलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील विविध मिठाईची दुकाने, अन्न पदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने यांच्यावर लक्ष ठेवताना सेंद्रिय अन्न पदार्थ टेस्टिंगची मोहीम अन्न आयुक्त संजय नारागडे यांनी सुरू केली आहे. त्यासाठी निरीक्षक दशरथ बांबळे, प्रशांत गुंजाळ, विजय पाचपुते यांचे साहाय्य लाभत आहे.
रस्त्याची चाळण
दापोली : जालगाव ते गव्हे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याची चाळण झाली आहे. मात्र त्यातूनच वाहनचालक, पादचाऱ्यांना मार्गक्रमण करावे लागत आहे. गव्हे येथील रोपवाटिकेमुळे सातत्याने या मार्गावर वाहतुकीची वर्दळ सुरू असते. खड्ड्यांतून पाणी, चिखल साचला असून, वाहनांमुळे पाचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे.
स्वच्छतेची मागणी
रत्नागिरी : गेट वे ऑफ रत्नागिरी अर्थात मांडवी समुद्रकिनाऱ्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली आहे. समुद्राच्या लाटांबरोबर आलेल्या प्लास्टीकच्या बाटल्या, पिशव्या, कचरा, झाडांच्या फांद्या तसेच अनेक वस्तू किनाऱ्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. पर्यटक येत नसले तरी स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
हर्डीकर यांची निवड
लांजा : भाजप लांजा युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी अथर्व हर्डीकर यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला भाजप दक्षिण जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, तालुका सरचिटणीस विराज हरमले आदी उपस्थित होते. या वेळी सात सदस्यांची कोअर कमिटी बनविण्यात आली.
सेवानिवृत्तांवर उपासमारीची वेळ
रत्नागिरी : एस.टी.च्या सेवानिवृत्त कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. औषधांसाठीही पैसे नसल्याने कामगारांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सेवानिवृत्तांची देणी तत्काळ देण्याची मागणी महाराष्ट्र एस.टी. संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे. दि. ४ जुलै रोजी होणाऱ्या मध्यवर्ती कार्यकारिणीत आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.
आरोग्य केंद्रासाठी भेट
देवरूख : प्राथमिक आरोग्य केंद्र कडवईसाठी पाण्याचा कूलर, इन्व्हर्टर भेट देण्यात आला. लतीप पागारकर व नूरजहाँ पागारकर यांच्या स्मरणार्थ पागारकर बंधूंनी साहित्य भेट दिले. या वेळी नवीन पागारकर, तन्वीर पागारकर, इस्माईल जुवळे, नासीर पिलपिले, मोअजम कडवईकर आदी उपस्थित होते.