प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत आंबा पिकाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:34 AM2021-09-27T04:34:16+5:302021-09-27T04:34:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी आंबा पिकाची निवड करण्यात आली असून या ...

Selection of mango crop under Pradhan Mantri Micro Food Processing Industries Scheme | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत आंबा पिकाची निवड

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत आंबा पिकाची निवड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी आंबा पिकाची निवड करण्यात आली असून या योजनेंतर्गत २०२१-२२ आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १४१ प्रक्रिया उद्योजकांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी नवीन उद्योग उभारू इच्छिणाऱ्या किंवा उद्योगाचे विस्तारीकरण अथवा आधुनिकीकरण करू इच्छिणाऱ्यांना लाभ घेता येणार आहे.

‘आत्मनिर्भर’ भारत पॅकेजमधून सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे. ही योजना २०२०-२१ ते २४-२५ अखेर पाच वर्षांच्या कालावधीसाठी राबविली जाणार आहे. असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांना आर्थिक बळ देऊन त्यामधून रोजगार निर्मितीचा या योजनेचा प्रयत्न आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उत्पादन होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योगांना चालना दिली जाणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातून आंबा पिकाची निवड करण्यात आली आहे. नवा उद्योग उभारायचा असल्यास ‘आंबा’ प्रक्रिया उद्योगच असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांना बँक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यातून लाभार्थ्यांना उद्योगासाठी लागणारे भांडवली खर्च भागवता येणार आहे. यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावा. रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या योजनेचा लाभ वैयक्तिक पातळीवर किंवा गट स्वरूपातही घेता येणार आहे. अर्ज सादर करणे, सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणे, कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे पाठपुरावा करणे आदी विविध कामांसाठी इच्छुक लाभार्थ्यांना साह्य करण्यासाठी जिल्हास्तरावर चार संसाधन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली असून डॉ. आनंद तेंडुलकर, अमर पाटील, उन्मेश वैशंपायन, शेखर विचारे यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी आंबा प्रक्रिया उद्योगासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Selection of mango crop under Pradhan Mantri Micro Food Processing Industries Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.