राजू घाणेकर यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:38 AM2021-09-16T04:38:53+5:302021-09-16T04:38:53+5:30
खेड : तालुक्यातील हेदली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजू घाणेकर यांची बिनविराेध निवड करण्यात आली. सलग ११ वर्षे ते तंटामुक्त ...
खेड : तालुक्यातील हेदली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजू घाणेकर यांची बिनविराेध निवड करण्यात आली. सलग ११ वर्षे ते तंटामुक्त समिती अध्यक्षपदी कार्यरत आहेत. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत २००९ साली शासनाचा तंटामुक्त गाव पुरस्कार जाहीर झाला होता.
आज रक्तदान शिबिर
मंडणगड : बहुजन समाज पार्टी दापोली विधानसभा क्षेत्रातर्फे दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील पेन्शनर्स सभागृहात रक्तदान शिबिर व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिबिरात ५० हून अधिक कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत.
आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन
दापोली : जिल्हा वार्षिक योजनेतून २० लाख १५ हजार ६६९ रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या दापोली तालुक्यातील गावतळे येथील आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर, कृषी पशुसंवर्धन सभापती रेश्मा झगडे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना रोपांचे वितरण
रत्नागिरी : कन्या वनसमृध्दी योजनेतंर्गत सामाजिक वनीकरण विभागातर्फे दि. १ जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या वृक्षलागवड मोहिमेत जिल्ह्यातील साडेपाच हजार शेतकरी कुटुंबांत कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल पन्नास हजार झाडांचे वितरण करण्यात आले. या रोपांचे संबंधित कुटुंबांनी संगोपन करायचे आहे.
पेढ्यांना मागणी
रत्नागिरी : अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने पेढे, मोदकांना विशेष मागणी आहे. काही भाविकांकडे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले जात असल्याने लाडू, चिवडा याचा विशेष खप होत आहे. विविध प्रकारच्या स्वादातील मोदक पेढे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.