शशांक पेडणेकर यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:26 AM2021-07-25T04:26:27+5:302021-07-25T04:26:27+5:30
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवरूखनजीकच्या किरदाडी गावचे सुपुत्र शशांक हरिश्चंद्र पेडणेकर यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. संगमेश्वर ...
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवरूखनजीकच्या किरदाडी गावचे सुपुत्र शशांक हरिश्चंद्र पेडणेकर यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात न्यायाधीश होण्याचा पहिला मान शशांक पेडणेकर यांना मिळाला आहे. पेडणेकर यांचा देवरूख बार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा देवरूख न्यायालयाच्या सभागृहात पार पडला.
किरदाडी येथील शशांक पेडणेकर यांची कोल्हापूर येथे दिवाणी न्यायाधीश क. स्तर म्हणून नियुक्ती झाली आहे. अॅड. चंद्रकांत मांगले यांच्या हस्ते पेडणेकर यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच अॅड. पूनम चव्हाण यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. समीर आठल्ये यांनी केले. यावेळी अॅड. सीमा गिड्ये, संतोष सोमण, चंद्रकांत मांगले, पूनम चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना पेडणेकर यांनी आपला पहिलाच व घरचा सत्कार असल्याचे सांगून हा एक अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले. यावेळी देवरूख बारचे वकील हळबे, गिरीष गानू, लक्ष्मीकांत जाधव, विजय पवार, राजेश शिंदे, चंद्रशेखर लिंबुकर, भक्ती मुरूडकर, शशांक मांगले उपस्थित होते.