रत्नागिरी येथे स्वसंरक्षण शिबिर उत्साहात
By Admin | Published: December 29, 2014 08:48 PM2014-12-29T20:48:38+5:302014-12-29T23:40:40+5:30
खाडे, घाणेकर उपस्थित : युगंधरा संमेलनात जिल्हा अॅमॅच्युअर असोसिएशनचे प्रदर्शन
चिपळूण : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे युगंधरा जिल्हास्तरीय विद्यार्थिनी संमेलन आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्हा अॅमॅच्युअर कराटे असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक योगिता खाडे व रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रशिक्षक चेतन घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वसंरक्षण शिबिर झाले.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता महिला व विद्यार्थिनी यांना महिलांविषयी असलेले कायदे व अधिकार ज्ञात व्हावेत, त्यांचे मनोबल वाढावे, विद्यार्थिनी सबळ व्हाव्यात, या अनुषंगाने राधाबाई शेट्ये सभागृह, गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे युगंधरा या जिल्हास्तरीय विद्यार्थिनी संमेलन झाले. त्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रत्नागिरी जिल्हा व रत्नागिरी जिल्हा अॅमॅच्युअर कराटे असोसिएशन यांचे सहकार्य लाभले. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील २०० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक योगिता खाडे यांच्यासोबत सर्व विद्यार्थिनींनी स्वसंरक्षण कलेचे प्रशिक्षण घेतले.
आंतरराष्ट्रीय खेळाडू योगिता खाडे व रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रशिक्षक चेतन घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कराटे, किकबॉक्सिंग, सिकई, बेल्ट रेसलिंग व कुडो मार्शल आर्टचे प्रमुख सांभवी मयेकर (चिपळूण), स्नेहल महाडिक (चिपळूण), चांदणी झा (चिपळूण), सेजल आंब्रे (चिपळूण), सीमा चांदोरकर (गुहागर), प्राजक्ता वरेकर (गुहागर), चेतन घाणेकर (रत्नागिरी), विनोद राऊत (चिपळूण), मंदार साळवी (खेड), प्रतीक मोहिते (लांजा), हुजैफा ठाकूर (गुहागर), स्वप्नील आग्रे (राजापूर), आशिष गमरे (गुहागर) आदी प्रशिक्षकांच्या उपस्थितीत स्वसंरक्षण शिबिर झाले.
शहराध्यक्ष श्रीकांत दुदगीकर, शहरमंत्री संकेत देवस्थळी, संमेलनप्रमुख अपूर्वा सरपोतदार, भाग्यश्री रायकर, शिवराज कांबळे, लीना घाडीगावकर, नेत्रा राजेशिर्के आदींनी विद्यार्थिनी संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. स्वसंरक्षण शिबिराच्या प्रशिक्षणाबद्दल योगिता खाडे यांचे आभार मानले. या प्रशिक्षण शिबिराचा फायदा होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)