ऑफलाईनने रास्त धान्य विक्री करा : रियाज ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:33 AM2021-04-28T04:33:26+5:302021-04-28T04:33:26+5:30
असगोली : सध्या काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जनतेला पॉस मशीनद्वारे रास्त धान्य न देता ऑफलाईनने धान्य ...
असगोली : सध्या काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जनतेला पॉस मशीनद्वारे रास्त धान्य न देता ऑफलाईनने धान्य वितरण करावे, असे निवेदन गुहागर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे.
गुहागरात काेराेनाचे रुग्ण वाढत असून, पॉस मशीनद्वारे रास्त धान्य जनतेला देणे धोकादायक आहे. या मशीनवर अनेकांचे अंगठे द्यावे लागतात. कोरोनाच्या रोगापासून सावधगिरी बाळगून याकरिता ऑफलाईन धान्य वितरण करावे, अशी मागणी केली आहे. तसेच सध्या रमजान महिना असल्यामुळे येथील जनतेला रास्त धान्य दुकानावर गेल्यावर नेटवर्क नसेल तर ताटकळत बसावे लागते. त्यामुळे ऑफलाईनने धान्य वितरण केल्यास ग्रामस्थांचा वेळही वाचेल. त्यामुळे शासनाने ऑफलाईन धान्य देण्याची सुविधा करावी, असे ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे.