बालकांबाबतीत संवेदनशीलता महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2016 09:23 PM2016-02-08T21:23:11+5:302016-02-08T23:52:13+5:30

विभा विरकर : बाल न्याय अधिनियम जनजागृती चर्चासत्र

Sensitivities are important for children | बालकांबाबतीत संवेदनशीलता महत्त्वाची

बालकांबाबतीत संवेदनशीलता महत्त्वाची

Next

ओरोस : आपले पद हे स्वत:साठी नसून मतदारांसाठी आहे. आज मी सदैव कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, कोकणचा विकास केवळ घोषणांनी होणार नाही, तर घोषणांची स्वप्ने सत्यात उतरावी लागतात. त्यासाठी सुलभता येण्याची गरज असल्याचे मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले. श्री सिद्धिविनायक मंदिर सभागृह लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, कसाल सरपंच नीलिमा पारकर, शिवसेना विभागप्रमुख डॉ. सूर्यकांत बालम, बाळा कांदळकर, पंकज परब, बळिराम परब, नागेश आरोसकर व ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. सूर्यकांत बालम म्हणाले की, सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून गेली ३३ वर्षे विविध कार्यक्रम राबवत आहे. मात्र, या ठिकाणी व्यासपीठ नव्हते. मागील वर्षी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या व आमदार नाईक यांच्यासह औरंगाबादचे खासदार राजकुमार धुत यांच्या फंडातून एकूण २० लाखांची तरतूद करून दिली. त्यानुसार हे सभागृह पूर्ण झाले असून त्याचा आज प्रारंभ होत आहे. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, शब्द देणे व त्याची पूर्तता करणे अवघड नाही, पण दिलेल्या निधीचा उपयोग योग्यरीतीने होतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. औरंगाबादचे खासदार राजकुमार धुत यांच्या निधीतून येथील जनतेने सुसज्ज सभागृह बांधून घेतले आहे. असे सांगताना कोकणचा विकास केवळ घोषणांनी होणार नाही तर त्यासाठी घोषणांची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. कोकणात सुबत्ता आल्यास विकास झपाट्याने होईल. सूत्रसंचालन बाळा कांदळकर, आभार अवधूत मालणकरांनी केले. (वार्ताहर)

पारकरांचा टोला -कोकणच्या विकासासाठी शब्द देणारे व तो शब्द पाळणारे खासदार विनायक राऊतच आहेत. अनेकांनी विविध आश्वासने दिली, परंतु केवळ विनायक राऊत यांनीच वर्षभराच्या कालावधीत दिलेला शब्द पूर्ण केला, असे सांगत शब्द देणारे अनेक आहेत, परंतु पाळणार केवळ शिवसेनाच, असाही टोला कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना नाव न घेता संदेश पारकर यांनी लगावला.

कसाल रेल्वेस्थानक मंजूर
दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची ताकद असून, आपण कसालवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करून घेत कसाल पंचक्रोशीसाठी कसाल येथे रेल्वेस्थानक मंजूर करू न घेतले आहे. त्यामुळे येथे लवकरच रेल्वेस्थानक उभे राहणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.


विकासकामांसाठी संपर्क साधा
आमदार वैभव नाईक म्हणाले की, खासदारसाहेब दिलेला शब्द पूर्ण करीत आहेत आणि करत राहणार. आपण कसालवासीयांना आवश्यक असलेली हायमास्टलाईट उपलब्ध करून दिली आहे. कसाल मतदारसंघात ४२ रस्ते दिले. त्याचप्रमाणे काही विकासकामांची गरज असल्यास संपर्क साधा, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Sensitivities are important for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.