कोरोनाचा वेगळा स्ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:21 AM2021-06-21T04:21:23+5:302021-06-21T04:21:23+5:30
२. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाही अनेकजण बेजबाबदारपणे वागत असल्याने त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. कोरोनामुळे सामाजिक अंतर, ...
२. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाही अनेकजण बेजबाबदारपणे वागत असल्याने त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. कोरोनामुळे सामाजिक अंतर, सतत हात धुणे आणि मास्क लावणे अशा महत्त्वाच्या सूचना प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत. तरीही काहीजण बेजबाबदारपणे मास्क न लावता फिरत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे.
३. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात विलगीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. अनेक विलगीकरण केंद्रांत कोरोनाची कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ग्राम कृती दले काम करत आहेत. अशा विलगीकरण केंद्रांमध्ये आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र, अनेक विलगीकरण केंद्रांमध्ये एकच शौचालय असल्याने तेथील रुग्णांच्या आरोग्याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.