कमी लोकसंख्या असतानाही पेढेत विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:21 AM2021-06-17T04:21:52+5:302021-06-17T04:21:52+5:30

चिपळूण : तालुक्यातील पेढे येथे लोकसहभागातून कोरोनाबाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक सोयीसुविधा लोकसहभागातून करण्यात ...

Separation room in the firm despite low population | कमी लोकसंख्या असतानाही पेढेत विलगीकरण कक्ष

कमी लोकसंख्या असतानाही पेढेत विलगीकरण कक्ष

Next

चिपळूण : तालुक्यातील पेढे येथे लोकसहभागातून कोरोनाबाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक सोयीसुविधा लोकसहभागातून करण्यात आल्या. आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत मंगळवारी या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

गृह अलगीकरणाची सुविधा बंद करुन गावोगावी विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे धोरण राज्य सरकारने हाती घेतले आहे. ज्या गावची लोकसंख्या २ हजारपेक्षा जास्त आहे, तिथे विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार तालुक्यात ३२ गावांमध्ये असे कक्ष सुरू झाले आहेत. या व्यतिरिक्त काही गावांनी स्वतः पुढाकार घेऊन विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. दोन हजारपेक्षा कमी लोकसंख्या असतानाही पेढे येथेही सरपंच प्रवीण पाकळे यांच्यासह सदस्य व ग्राम कृती दलाने विलगीकरण कक्षासाठी मेहनत घेतली. या कक्षासाठी दानशुरांना मदतीचे आवाहन करताच अनेकांनी मदतीचा हात दिला. त्यानुसार पेढेतील आर. सी. काळे विद्यालयात हा कक्ष सुरू झाला आहे.

या कक्षासाठी श्रीदेव भार्गवराम परशुराम देवस्थानने खाटा दिल्या. गाद्या, स्टिमर, गरम पाण्यासाठी गिझर, पाण्याचे जार, सॅनिटायझर, तापमापक, ऑक्सिमीटर आदी सर्व सुविधाही दानशुरांकडून मिळाल्या आहेत. यापुढे येणाऱ्या खर्चासाठीही काहीजण पुढे आले आहेत. आमदार निकम आणि जाधव यांनी या कक्षाचे कौतुक केले. कक्षाला काही मदत लागल्यास ती करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रवीण पाकळे, सभापती रिया कांबळे, पंचायत समिती सदस्य ऋतुजा पवार, उपसरपंच संदीप काणेकर, माजी सरपंच दीपक मोरे, विनायक भोसले, मेघना सुर्वे, वालोपे सरपंच रवींद्र आयरे, अभय सहस्त्रबुद्धे, मुख्याध्यापक भास्कर कदम, ग्रामविकास अधिकारी एन. आर. कटरे, बबन पडवेकर, गजानन भोसले, सुनील नरळकर, वैष्णवी पाणकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Separation room in the firm despite low population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.