साडवली येथे विलगीकरण कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:47+5:302021-06-18T04:22:47+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याचे उद्घाटन माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याचे उद्घाटन माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले.
सद्यस्थितीत साडवली गावामध्ये लोकसंख्येचा विचार करून कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक भूमिका ग्रामपातळीवर राबविण्यात येत आहे़ लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी व बाधित लोकांना आपल्याच गावात उपचार मिळण्यासाठी कटिबद्ध राहून क्रीडा संकुल येथे २० बेडचे ग्राम विलगीकरण कक्ष साडवली ग्राम कृती दलातर्फे स्थापन करण्यात आले.
कक्षाचे उद्घाटन सरपंच राजेश जाधव यांनी फीत कापून केले़ यावेळी स्वतःची जागा देण्याचे योगदान देणारे माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य मुग्धा जागुष्टे, नेहा माने यांची प्रमुख उपस्थिती हाेती़ तसेच प्रद्युम्न माने, सायले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ चंद्रकांत सूर्यवंशी, डॉ़ स्वप्निल धने, ग्रामसेवक लोटणकर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ़ हत्तपक्की, ठाकरे हायस्कूल मुख्याध्यापक बी़ व्ही़ नलावडे, जनक जागुष्टे तसेच ग्राम कृती दल सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती लाभली.