नवनिर्माण नर्सिंग महाविद्यालयात पोस्ट कोविड केअर समुपदेशन केंद्राची सेवा सोमवारपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:32 AM2021-05-09T04:32:08+5:302021-05-09T04:32:08+5:30
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोरोना रुग्णांना आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात, या हेतूने येथील मातृमंदिर कोविड केअर सेंटरसोबत संगमेश्वर येथील ...
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोरोना रुग्णांना आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात, या हेतूने येथील मातृमंदिर कोविड केअर सेंटरसोबत संगमेश्वर येथील नवनिर्माण नर्सिंग महाविदयालयाच्या टीमने पोस्ट कोविड केअर समुपदेशन केंद्र आणि ‘ऑनलाईन व्हॅक्सिन रजिस्ट्रेशन’ सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा प्रारंभ सोमवार, दि १० मे रोजी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंग आणि राष्ट्र सेवा दल, देवरुख यांच्यावतीने हे सेन्टर सुरू करण्यात येणार आहे. आमदार शेखर निकम, मातृमंदिरचे कार्याध्यक्ष आणि संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, डॉ. परमेश्वर गोंडए, तहसीलदार सुहास थोरात, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, तालुका वैद्यकीय अधिकारी सोनवणे, नवनिर्माण नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या प्रज्ञा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
मातृमंदिरचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअर सेन्टर सुरू करण्यात आले आहे. कोरोनातून बाहेर पडल्यानंतर कोरोना रुग्णांची आणि नातेवाईकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पोस्ट कोविड केअर समुपदेशन केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कोरोना काळातील आवश्यक त्या नियमांचे पालन करून या केंद्राचा लाभ घ्यावा. याची ॲानलाईन सुविधाही उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती प्राचार्या प्रज्ञा कदम यांनी दिली आहे.