जिल्ह्यात सात कोरोनाबाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:38 AM2021-08-18T04:38:08+5:302021-08-18T04:38:08+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी जिल्ह्यात १४७ कोरोना रुग्ण सापडले असून, सातजणांचा मृत्यू झाला आहे. २८८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी ...
रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी जिल्ह्यात १४७ कोरोना रुग्ण सापडले असून, सातजणांचा मृत्यू झाला आहे. २८८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेल्याने सक्रिय रुग्णांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.
मंगळवारी १४७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या ७४ हजार ४२३ इतकी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७२ टक्के असून, बरे झालेल्या २८८ रुग्णांना मंगळवारी घरी पाठविण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७० हजार ४९० इतकी आहे. मृत्यूचे प्रमाण २.९८ टक्के असून, मंगळवारी ५ व पूर्वीचे दोन मिळून एकूण सात व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दापोली तालुक्यातील २, रत्नागिरीतील ३, राजापूर आणि चिपळूण तालुक्यातील प्रत्येकी १ यांचा समावेश आहे. जिल्हाभरात ५,३०४ रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५,१५७ लोकांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. आरटीपीसीआरमध्ये ९८, तर अँटिजन चाचणीत ४९ असे १४७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. गृहविलगीकरणामध्ये ८४४, तर संस्थात्मक विलगीकरणामध्ये ७२३ रुग्ण आहेत. सध्या जिल्ह्यात १५६७ रुग्ण सक्रिय असून १,७१८ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण २.९८ असून, एकूण मृत्यूपैकी ५० व ५० पेक्षा जास्त वयोगटातील मृतांची संख्या २२१५, तर एकूण मृत्यूंपैकी आजारपण असलेल्या मृतांची संख्या ७९७ आहे. आतापर्यंत एकूण मृत्यूची संख्या २२१५ झाली आहे.