शिरसगावला सात, अंबोलीत पाच उमेदवार बिनविरोध

By admin | Published: April 12, 2016 11:35 PM2016-04-12T23:35:36+5:302016-04-12T23:38:22+5:30

शिरसगावला सात, अंबोलीत पाच उमेदवार बिनविरोध

Seven in Shirasgaon, five candidates from Amboli are uncontested | शिरसगावला सात, अंबोलीत पाच उमेदवार बिनविरोध

शिरसगावला सात, अंबोलीत पाच उमेदवार बिनविरोध

Next


त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिरसगावला सात, तर अंबोलीत पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
तालुक्यातील शिरसगाव (त्र्यंबकेश्वर) ग्रामपंचायतीचे सातही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये विमल मिंदे, गौतम मोंढे, निवृत्ती लिलके, कौसाबाई लिलके, नवसू आचारी, अंजना लिलके, सुनीता मोंढे हे
उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शिरसगाव विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक संतोष मोंढे, उपसरंपच रंगनाथ मिंदे, संजय मिंदे, सुदाम मिंदे, पांडुरंग मिंदे, मनोहर मिंदे, विजय गागुर्डे, मधुकर मोंढे, निवृत्ती दिवे, रावजी दिवे यांनी प्रयत्न केले.
त्र्यंबकेश्वर-जव्हार मार्गावरील अंबोली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पाच उमेदवार
बिनविरोध निवडून आले. लंकाबाई मेढे, ज्योती लचके, काळूबाई ताठे, काळू लचके, राधा गुंबाळे बिनविरोध निवडून आले.
बिनविरोध निवडीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरुण मेढे, नंदराज मेढे, संजय मेढे, जानकीराम मेढे, मोतीराम मेढे, अ‍ॅड. भास्कर मेढे, तानाजी मेढे, पंढरीनाथ मेढे, पाडुरंग लचके, गोपाळा मेढे यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)

Web Title: Seven in Shirasgaon, five candidates from Amboli are uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.