शहीद मेजरचे अधुरे स्वप्न पत्नी करणार पूर्ण : गौरी महाडीक, लवकरच सैन्यात होणार भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:02 PM2019-03-01T12:02:19+5:302019-03-01T12:06:20+5:30

गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावचे सुपुत्र मेजर प्रसाद गणेश महाडिक चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त होउन त्यांना हौतात्म पत्करले. दिनांक ३० डिसेंबर २०१७ रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्करी तंबूला भीषण आग लागून त्यात मेजर प्रसाद गणेश महाडिक यांना वीरमरण प्राप्त झाले. मात्र त्याचं अधूर राहिलेलं स्वप्न त्यांच्या पत्नी गौरी महाडिक पूर्ण करणार आहेत.

Shaheed Major completed his dream dream wife: Gauri Mahadiyak, will be soon recruited to the army | शहीद मेजरचे अधुरे स्वप्न पत्नी करणार पूर्ण : गौरी महाडीक, लवकरच सैन्यात होणार भरती

शहीद मेजरचे अधुरे स्वप्न पत्नी करणार पूर्ण : गौरी महाडीक, लवकरच सैन्यात होणार भरती

Next
ठळक मुद्देशहीद मेजरचे अधुरे स्वप्न पत्नी करणार पूर्ण : गौरी महाडीकलवकरच सैन्यात होणार भरती

गुहागर : तालुक्यातील कुटगिरी गावचे सुपुत्र मेजर प्रसाद गणेश महाडिक चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त होउन त्यांना हौतात्म पत्करले. दिनांक ३० डिसेंबर २०१७ रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्करी तंबूला भीषण आग लागून त्यात मेजर प्रसाद गणेश महाडिक यांना वीरमरण प्राप्त झाले. मात्र त्याचं अधूर राहिलेलं स्वप्न त्यांच्या पत्नी गौरी महाडिक पूर्ण करणार आहेत.

ज्याच्याबरोबर आयुष्याची खुणगाठ बांधली गेली तो पती मेजर प्रसाद दोन वर्षांपूर्वी इंडो-चायना बॉर्डरवरील तवांग सेक्टरमध्ये शहीद झाले. त्यामुळे सर्वस्व गमावल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. मात्र दु:खाला कवटाळून न बसता थेट दुर्गेचं रूप धारण केलं आणि आता त्या लवकरच सैन्य दलात दाखल होणार आहे. गौरी महाडिक वयाच्या ३१व्या वर्षी सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला. शत्रूशी दोन हात करण्यासाठी त्या सज्ज झाल्या असून आपल्या पतीला अनोखी मानवंदना देऊन देशाची सेवा करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

गौरी आणि मेजर प्रसाद महाडिक यांच सन २०१५मध्ये लग्न झालं होतं. मुंबई- विरारमध्ये दोघे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. भारतीय लष्कराच्या अधिकारी प्रशिक्षण केंद्र्रात रुजू होण्यास गौरी महाडिक सज्ज झाल्या आहेत. या केंद्र्रामधून ४९ आठवडे प्रशिक्षण मिळणार असून त्यानंतर थेट लेफ्टनंट पदावर गौरी महाडिक यांची नियुक्ती केली जाणार आहे. एका वर्षानंतर आता गौरी महाडिक अधिकारी प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्यास सज्ज झाल्या आहेत. ही खडतर परीक्षा पास झाल्याचे समजताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


गौरी महाडिक यांनी लष्करात भरती होण्याच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, मेजर पती शहीद झाल्यानंतर १० दिवसांनंतर मी विचार केला की आता मी काय करू? मी काय केले पाहिजे? एका जागी बसून मी रडत राहू शकणार नव्हती. कारण मी कायम आनंदात रहावे अशीच त्यांची इच्छा होती. मला माझ्या पतीला अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं होतं. यामुळेच मी लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचा गणवेश परिधान करणार आहे. तो गणवेश फक्त माझा एकटीचा नसणार आहे तर आम्हा दोघांचा असेल, अशी भावना गौरी महाडिक यांनी व्यक्त केली आहे.


गौरी महाडिक या पेशाने वकील असून एका नामांकित कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करीत होत्या, मात्र लष्करात भरती होण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्यांनी ही नोकरी सोडली आणि लष्करी भरतीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची आॅनलाईन परीक्षा प्रथम क्रमांक मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या असून चेन्नई येथे एप्रिलमध्ये होणाऱ्या लष्करी अधिकारी प्रशिक्षण केंद्रात दाखल होणार आहेत.
2 अ३३ंूँेील्ल३२

Web Title: Shaheed Major completed his dream dream wife: Gauri Mahadiyak, will be soon recruited to the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.