निसर्ग, सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण अध्यक्षपदी शैलजा लांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:29 AM2021-03-21T04:29:58+5:302021-03-21T04:29:58+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृतीचे कार्य करणाऱ्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची चिपळूण तालुका ...

Shailja Lande as President of Nature, Social Environment Pollution Prevention | निसर्ग, सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण अध्यक्षपदी शैलजा लांडे

निसर्ग, सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण अध्यक्षपदी शैलजा लांडे

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृतीचे कार्य करणाऱ्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची चिपळूण तालुका महिला कार्यकारिणी राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक यांनी जाहीर केली. अध्यक्षपदी शैलजा रामभाऊ लांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शिक्षक समितीच्या चिपळूण शाखेच्यावतीने तालुक्यातील महिलांचा मेळावा प्राथमिक शिक्षक पतपेढी येथे पार पडला. या कार्यक्रमात ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी उपाध्यक्ष - मायावती शिपटे, सचिव - विनया विलास देवरुखकर, खजिनदार - प्रिया खेडेकर, संघटक - सीमा संजय कदम, सुखदा विकास कुळे, सदस्य - सुप्रिया सु. उबळेकर, कल्पना चव्हाण, विशाखा गमरे, प्रांजली प्रशांत चव्हाण, विद्या जालगावकर, संगीता विलास गावडे, प्रिया माने यांचा समावेश आहे.

सर्व नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक, राज्यसंघटक दीपक शिंदे, चिपळूण विस्तार अधिकारी नसरीन खडस यांच्या हस्ते निवडपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळाचे राज्यसंघटक दीपक शिंदे, चिपळूण शिक्षक समितीचे अध्यक्ष प्रकाश शिंदे, आर. डी. मोहिते, विकास कुळे उपस्थित होते.

Web Title: Shailja Lande as President of Nature, Social Environment Pollution Prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.