रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण मुसळधार पावसाने ओवरफ्लो; नागरिकांमध्ये समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 02:39 PM2023-07-10T14:39:23+5:302023-07-10T15:12:01+5:30

जून महिन्यात खालावलेल्या स्थितीत असलेल्या कोकणातील धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रात आता सिंचनाची टक्केवारी वाढू लागली आहे.

Sheel Dam, which supplies water to Ratnagiri, overflows due to heavy rains; Satisfaction among citizens | रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण मुसळधार पावसाने ओवरफ्लो; नागरिकांमध्ये समाधान

रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण मुसळधार पावसाने ओवरफ्लो; नागरिकांमध्ये समाधान

googlenewsNext

रत्नागिरी- यावर्षी मोसमी पाऊस वातावरणीय प्रतिकुलतेने कोकणात दाखल होण्यास उशीर झाला. अडलेल्या स्थितीत असलेल्या मोसमी पावसाच्या सक्रियतेबाबत अडचणी झाल्या. अखेर जूनच्या अखेरिस मोसमी पाऊस २० जूननंतर सक्रिय झाला. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाचा विस्तार सर्वदूर झाला. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर दहा दिवसाच्या सातत्यपूर्ण प्रवासाने आता पाणलोट क्षेत्रात सिंचनाला बळ मिळाले आहे.

जून महिन्यात खालावलेल्या स्थितीत असलेल्या कोकणातील धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रात आता सिंचनाची टक्केवारी वाढू लागली आहे. रत्नागिरीत गेल्या दीड ते दोन महिने शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. पाऊस लांबल्याने काही दिवसापूर्वी पाणीबाणी ची वेळ रत्नागिरीकरांवर आली होती. परंतु गेल्या पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने रत्नागिरी शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शीळ धरणातील पाणीसाठा वाढला आहे. सध्या शीळ धरण ओव्हरफ्लो झाल्याचे दिसत आहे. रत्नागिरी शहरवासीयांना आता मुबलक पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे चित्र दिसत आहे.

Web Title: Sheel Dam, which supplies water to Ratnagiri, overflows due to heavy rains; Satisfaction among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.