संगमेश्वरात कोविड रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारला निवारा कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:58+5:302021-07-07T04:38:58+5:30
देवरुख : संगमेश्वर येथील काेविड सेंटरमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षाचे उद्घाटन भाजपचे जिल्हा ...
देवरुख : संगमेश्वर येथील काेविड सेंटरमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षाचे उद्घाटन भाजपचे जिल्हा प्रभारी प्रमाेद जठार यांच्याहस्ते करण्यात आला.
रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची गैरसोय होत असल्याचे रुग्णालय अधीक्षक डाॅ. अंबरिश आगाशे व भाजप जिल्हा उपाध्यक्ष हरिभाई पटेल यांनी प्रमोद जठार यांनी याबाबत माहिती दिली. याची दखल घेत जठार यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्याठिकाणी कोविड रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा कक्षाची उभारणी करण्यात आली. या कक्षाच्या उद्घाटनावेळी तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव, तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा दीपिका जोशी, महिला तालुका अध्यक्षा कोमल रहाटे, युवा मोर्चा जिल्हा कोषाध्यक्ष सतीश पटेल, ज्येष्ठ नेते मुकुंद जोशी, कांता भागवत, भगवतसिंग चुंडावत, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस निखिल लोध, युवामोर्चा शहराध्यक्ष अनुप प्रसादे, दादा कोळवणकर, शहराध्यक्ष दीपक वेल्हाळ, सुनीत कदम, डाॅ. अंबरिश आगाशे उपस्थित होते.