काताळे गावात नऊ वर्षांनंतर पुन्हा शिमगोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:28 AM2021-04-03T04:28:09+5:302021-04-03T04:28:09+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क आबलोली : गुहागर तालुक्यातील काताळे गावातील अंतर्गत वादामुळे एकाच ठिकाणी हाेणारे हाेम यावर्षी मात्र पूर्वांपार ...

Shimgotsav celebrated again after nine years in Katale village | काताळे गावात नऊ वर्षांनंतर पुन्हा शिमगोत्सव साजरा

काताळे गावात नऊ वर्षांनंतर पुन्हा शिमगोत्सव साजरा

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

आबलोली : गुहागर तालुक्यातील काताळे गावातील अंतर्गत वादामुळे एकाच ठिकाणी हाेणारे हाेम यावर्षी मात्र पूर्वांपार जागी लावण्यात आले. ग्रामस्थांच्या एकाेप्यामुळे तब्बल ९ वर्षांनतर ग्रामदेवतेचा शिमगाेत्सवातील तीनही हाेम पूर्वांपार लागल्याने ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला.

काताळे येथील ग्रामदेवता श्री भैरी, कालकी, चंडिका देवीचे पारंपरिक तीन शिमगे वेगवेगळ्या जागृत ठिकाणी म्हणजेच कदमवाडी सहानेवर पहिला होम, कोंडचा भैरी देव मंदिर येथे दुसरा होम, तर सोमनाथ मंदिर येथे तिसरा होम, अशा प्रकारे होत असत; परंतु सन २०१३ साली झालेल्या गावातील काही अंतर्गत वादामुळे गुहागर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गावातील मानकरी यांनी पूर्ण शिमगोत्सव बंद होण्यापेक्षा या वादावर तोडगा म्हणून तिन्ही शिमगे एकाच ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार नऊ वर्षे कोणतेही वादविवाद न होता कमी लोकसंख्या असूनही उत्सव आनंदाने होत आहे.

म्हणूनच पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे होम सुरू केले तर आणखी लोक या उत्सवात आनंदाने सहभागी होतील याची शक्यता वाटल्याने स्थानिक प्रशासनाला ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीनुसार व त्यांच्या लेखी परवानगीने हे होम यावर्षीपासून पूर्वीप्रमाणे त्या त्या ठिकाणी करण्याचे ठरले व त्याप्रमाणे आनंदाने पारही पडले.

पहिला होम ग्रामदैवत मंदिर येथील जवळच सहानेवर लागल्यानंतर दुसऱ्या होमचे म्हणजेच कोंडचा भैरी देव मंदिर हे ठिकाण दूर असल्याने या ठिकाणी पालखी वाहनाने घेऊन जाण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला व तिसरा होम सोमनाथ मंदिर येथे लागल्यानंतर नेहमीप्रमाणे पालखी हळदी-कुंकू समारंभासाठी अरुण कदम यांच्याकडे जाऊन येईल व नंतर सहानेवर एकाच ठिकाणी गावातील प्रत्येक वाडीच्या पूजा, आरत्या प्रत्येक वाडीनुसार त्या त्या दिवशी होतील, सर्व वाडीच्या पूजा/आरत्या झाल्यावर सत्यनारायणाची महापूजा होईल व त्याच दिवशी भजन आणि नमनाचा कार्यक्रम होऊन दुसऱ्या दिवशी पालखी देवळात जाईल, असे ठरविण्यात आले.

हा उत्सव नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यास अरुण कदम, जयवंत कदम, दिलीप काताळकर, नामदेव बारस्कर, पोलीस पाटील सचिन रसाळ तसेच देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी सुधाकर बारस्कर, भिकू बारस्कर, सूर्यकांत काताळकर, मंगेश बारस्कर, महादेव बारस्कर, रवींद्र कुळये, दीपक बारस्कर, मधुकर अजगोलकर, दत्ताराम कुळये, सुरेश रसाळ, रमेश खारवटकर, प्रकाश सावंत यांच्यासह ग्रामस्थांचा सहभाग हाेता.

Web Title: Shimgotsav celebrated again after nine years in Katale village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.