राष्ट्रीय खो-खो पटू अपेक्षा सुतार हिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 01:25 PM2023-05-17T13:25:31+5:302023-05-17T13:26:07+5:30

 राष्ट्रीय खो-खो पटू रत्नकन्या अपेक्षा अनिल सुतार हिला महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Shiv Chhatrapati State Sports Award announced to National Kho-Kho player Preksha Sutar | राष्ट्रीय खो-खो पटू अपेक्षा सुतार हिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय खो-खो पटू अपेक्षा सुतार हिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

googlenewsNext

मेहरून नाकाडे

रत्नागिरी :  राष्ट्रीय खो-खो पटू रत्नकन्या अपेक्षा अनिल सुतार हिला महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. अपेक्षाने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

अपेक्षा पाचवीत असल्यापासून खो-खो खेळत आहे. रा.भा.शिर्के शाळेची विद्यार्थिनी असून तिला विनोद मयेकर, पंकज चवंडे या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. अपेक्षाने वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केली असून उत्कृष्ट खेळामुळे तिने विविध गटातून जिल्हा, विभागिय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. गतवर्षी नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत अपेक्षा सहभागी झाली होते, तेथेही तिने सुवर्णपदक मिळविले होते.  मार्च मध्ये आसाम येथे झालेल्या चौथ्या आशियाई स्पर्धेत आसाम येथे चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले होते.

अपेक्षाला तिच्या उत्कृष्ट खेळामुळे खो-खो क्षेत्रातील मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. १८ वर्षे वयोगटातील जानकी पुरस्कार, खुल्या गटातील राणी लक्ष्मीबाई पुरस्कार अपेक्षाने मिळविला आहे. आता २०२१-२२ चा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. अपेक्षाच्या यशाने रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
 महाराष्ट्र खो खो संघटनेचे माजी सचिव संदीप तावडे यांचे अपेक्षाला मार्गदर्शन लाभत आहे. अपेक्षा हिच्या निवडीबद्दल सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Shiv Chhatrapati State Sports Award announced to National Kho-Kho player Preksha Sutar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.