शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान संघटनेतर्फे शिवजयंती साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:32 AM2021-04-04T04:32:24+5:302021-04-04T04:32:24+5:30

रत्नागिरी : येथील शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान संघटनेतर्फे गेली सहा वर्षे अव्याहतपणे मारुती मंदिर येथील अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची रोज पूजा ...

Shiv Pratishthan Hindustan Sanghatana simply celebrates Shiv Jayanti | शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान संघटनेतर्फे शिवजयंती साधेपणाने साजरी

शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान संघटनेतर्फे शिवजयंती साधेपणाने साजरी

Next

रत्नागिरी : येथील शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान संघटनेतर्फे गेली सहा वर्षे अव्याहतपणे मारुती मंदिर येथील अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची रोज पूजा करण्यात येत आहे. शिवजयंतीनिमित्त बुधवारी केलेल्या पूजेमध्ये आरतीसाठी शहरातील काही नागरिकही सहभागी झाले होते.

श्री शिवप्रतिष्ठाण संघटनेची १० ते १५ मंडळी दररोज पहाटे पूजेसाठी एकत्र येतात. घरातील दैवताप्रमाणे रोज सकाळी मूर्तीची स्वच्छता करण्यात येते. त्यानंतर मूर्तीला गंध, तिलक लावून पुष्पहार अर्पण केला जातो. त्यानंतर महाराजांची आरती केली जाते. प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र सादर करण्यात येतो. बुधवारी सकाळी ५.३० वाजण्याचा सुमारास भगवती किल्ल्यावर जाऊन शिवज्योत आणली. भगवती बंदर ते मारुती मंदिर अशी शिवप्रतिष्ठाणच्या धारकऱ्यांनी शिवज्योत आणली.

यावेळी शिवप्रतिष्ठाणचे अध्यक्ष राकेश नलावडे, अक्षत सावंत, जयदीप साळवी, अमित काटे, समीर सावंत, प्रशांत कंगराळकर, सखाराम राणे,

देवेंद्र झापडेकर, कार्तिक कापरे, अमन कांबळे, सुधीर मावडी, शौर्य मांजरेकर, अथर्व शिंदे, समीर घोरपडे, कश्यप घोरपडे, निखिल सावंत, वैभव पांचाळ, अमित नाईक असे धारकरी व काही नागरिक उपस्थित होते.

Web Title: Shiv Pratishthan Hindustan Sanghatana simply celebrates Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.