शिवसेना, राष्ट्रवादीचा नगराध्यक्षांना दणका

By admin | Published: August 31, 2016 11:59 PM2016-08-31T23:59:32+5:302016-09-01T00:42:15+5:30

रत्नागिरी नगरपरिषद सभा १५ सप्टेंबरपर्यंत तहकूब

Shiv Sena, NCP's Chief of the Town President | शिवसेना, राष्ट्रवादीचा नगराध्यक्षांना दणका

शिवसेना, राष्ट्रवादीचा नगराध्यक्षांना दणका

Next

रत्नागिरी : शहरातील पाणीप्रश्न, रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याचे साम्राज्य, बंद पडलेले पथदीप, शहराबाहेर दिलेल्या पाणी जोडण्या यासारख्या प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची बुधवारी कोंडी केली. २० सदस्यांच्या प्रखर विरोधापुढे अखेर नगराध्यक्षांना झुकावे लागले. त्यामुळे बुधवारची सभा १५ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. ही सभा आता १६ सप्टेंबरला होणार आहे.
नगर परिषदेच्या बुधवारच्या सभेत शून्य प्रहरात सेना, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी शहरातील अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. शहरात कचऱ्याचे ढीग असून, दुर्गंधी पसरली आहे. असंख्य पथदीप बंद आहेत. भर पावसाळ्यातही शहरवासीयांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. शहराला पाणी पुरविणारे शीळ धरण व पानवल धरण पूर्ण भरलेले आहे. मात्र, पाणीपुरवठ्याचे नियोजन नाही. हे प्रश्न गंभीर बनलेले असताना नगराध्यक्ष मयेकर यांचे त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला. नगराध्यक्षांना मंगळागौर कार्यक्रमासाठी वेळ आहे, मात्र मूलभूत प्रश्नच ते विसरले आहेत, असा हल्लाबोल सेनेचे नगरसेवक बंड्या साळवी यांनी केला.
मिलिंद कीर, उमेश शेट्ये यांनी पाणीप्रश्नावर झोड उठविली. शहराबाहेर तिवंडेवाडीतील साडेचारशे सदनिका असलेल्या गृहसंकुलास नगरपरिषदेने दिलेली पाणी जोडणी रद्द करण्याची मागणी नगरसेवक राहुल पंडित यांनी
केली.
अनधिकृत नळ जोडण्या रद्द करण्याची मागणी उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे यांनी केली. हद्दीबाहेरील शिरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात दिलेल्या नळ जोडण्या रद्द करा, पऱ्याच्या आळीतील इमारतीच्या बेसमेंटमध्ये ६ फूट पाणी भरूनही त्याबाबत कारवाई का नाही, असे सवाल करीत भाजपचे नगरसेवक अशोक मयेकर यांनी नगराध्यक्षांना घरचा आहेर दिला.
शहरातील या समस्या गंभीर वळणावर आहेत. गणेशोत्सव चार दिवसांवर आला आहे. त्यामुळे या समस्यांची सोडवणूक प्रथम करावी व नंतरच सभा घ्यावी. तोपर्यंत सभा तहकूब करावी. पक्षाचे नगरसेवक सभेसाठी सहकार्य करणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या १५, तर राष्ट्रवादीच्या ५ नगरसेवकांनी घेतली होती. तशी स्वतंत्र पत्रही दोन्ही पक्षांतर्फे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना मंगळवारी देण्यात आली होती. त्यामुळे बुधवारची सभा वादळी ठरणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. प्रखर विरोधामुळे सभा तहकूब करावी लागली. (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena, NCP's Chief of the Town President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.