Ratnagiri: शिवसेना ठाकरे गटाच्या चिपळूण तालुकाप्रमुखांसह नऊ जणांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय..जाणून घ्या
By संदीप बांद्रे | Published: December 16, 2023 04:54 PM2023-12-16T16:54:27+5:302023-12-16T16:57:09+5:30
चिपळूण : महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून भरती प्रक्रिया थांबवल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह नऊ ...
चिपळूण : महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून भरती प्रक्रिया थांबवल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह नऊ जणांची नुकतीच रत्नागिरीतील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
महावितरणच्या भरतीमध्ये कंत्राटी कामगारांसह स्थानिकांना प्राधान्य द्या, या मागणीसाठी ठाकरे गटाने महावितरणवर मोर्चा काढून भरती प्रक्रियेत बाधा आणली होती. यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह देवेंद्र उर्फ बंटी सदानंद वणजू, अशोक सावंत ( मालवण), आनंद शिरवलकर (कुडाळ), सचिन माजळकर, ( लांजा) सागर उर्फ बाळा दवंडे, अशोक वाडेकर, अमेय मसुरकर, मेहेताब साखरकर, आय. टी. मयेकर यांची नुकतीच रत्नागिरीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अंबाळकर साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली.
याप्रकरणी वरील सर्वांवर भांदवि कलम १४३, १४५, १४७, १४९, ३४१,३५३,१८९,५०४,५०६,१४० नुसार दोषारोप ठेवण्यात आले होते. या सर्वांतर्फे अॅड योगेंद्र गुरव, अॅड.सचिन थरवळ, अॅड.लीना गुरव, अॅड.अपूर्वा करंदीकर, अॅड.स्वाती शेडगे यांनी काम पाहिले.