भाजपच्या प्रश्नांवर शिवसेना निरूत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:39 AM2021-09-09T04:39:04+5:302021-09-09T04:39:04+5:30

लांजा : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील जातीवाचक वाड्यांची नावे बदलण्यासंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या आदेशासंदर्भात बुधवारी विशेष सभेत विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेला ...

Shiv Sena unanswered on BJP's questions | भाजपच्या प्रश्नांवर शिवसेना निरूत्तर

भाजपच्या प्रश्नांवर शिवसेना निरूत्तर

Next

लांजा

: नगरपंचायत कार्यक्षेत्रातील जातीवाचक वाड्यांची नावे बदलण्यासंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या आदेशासंदर्भात बुधवारी विशेष सभेत विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच अडचणीत आणले. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला सत्ताधारी शिवसेनेला उत्तरे देता आली नाहीत. यासंदर्भात पुढील कार्यवाही प्रशासन करेल, असे सांगून नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी ही सभा गुंडाळल्याची माहिती भाजप गटनेते संजय यादव यांनी दिली.

नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वाड्या, रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यासंदर्भातील आदेश शासनाने काढला आहे. मात्र, संबंधित वाड्यांची नावे बदलण्यास लांजा शहर भाजपने तीव्र विरोध केला आहे.

या पार्श्वभूमीवर या विषयावर लांजा नगरपंचायतीची विशेष सभा बुधवारी (दि. ८) झाली. या ऑनलाईन सभेत सुरुवातीलाच भाजपच्या नगरसेवकांनी सदरहू वाड्यांची नावे बदलण्यासंदर्भात आपण कोणत्या प्रकारे अंमलबजावणी केली आहे? कोणते पत्र संबंधित लोकांना दिले आहेत? लोकांची याबाबत चर्चा केली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर नगराध्यक्षांनी मौन बाळगले.

ज्या वाड्यांची नावे बदलण्यासाठी जो प्रयत्न सुरू आहे, त्या वाड्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आली. मात्र, त्याबाबतही सत्ताधारी शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारे उत्तर दिले गेले नाही. नगरपंचायत प्रभाग क्रमांक एकमधील कुक्कुटपालन, सुतारवाडी या वाड्यांचे नामकरण साईनगर करण्यात यावे, अशा संदर्भातील येथील नगरसेवक राजू हळदणकर यांच्या सहीचे पत्र दिवसभर व्हाॅट्सॲपवर फिरत होते. यासंदर्भात बुधवारी येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांबाबत नाराजी व्यक्त केली. आम्हाला यासंदर्भात कोणत्याही प्रकारे माहिती दिली गेली नाही, असा आक्षेप घेत त्यांनी नामांतरास आमचा तीव्र विरोध असल्याचे पत्र विरोधी पक्षांना सादर केले. याचाही जाब भाजपच्या नगरसेवकांनी बैठकीत विचारला. मात्र, यावरही त्यांना कोणतेही उत्तरे समर्पक उत्तर देता आले नाही.

या विषयावरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडून भाजपचे गटनेते संजय यादव यांनी वाड्यांची नावे बदलासंदर्भात तुमची नेमकी भूमिका स्पष्ट करा, असे सांगितले. मात्र, नगराध्यक्ष मनोहर बाईत त्यांनी हा विषय यापुढे प्रशासन हाताळेल, असे सांगून चेंडू प्रशासनाच्या कोर्टात टाकला.

Web Title: Shiv Sena unanswered on BJP's questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.