काही दिवसांनी शिवसेना सत्तेत नसेल : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:36 AM2021-08-25T04:36:27+5:302021-08-25T04:36:27+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क आरवली : राज्यात शिवसेनेची सत्ता आहे, पण येथे विराेध करायला केवळ १२ झेंडे दिसत आहेत. हिंदुत्वाशी ...

Shiv Sena will not be in power in a few days: Narayan Rane | काही दिवसांनी शिवसेना सत्तेत नसेल : नारायण राणे

काही दिवसांनी शिवसेना सत्तेत नसेल : नारायण राणे

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरवली : राज्यात शिवसेनेची सत्ता आहे, पण येथे विराेध करायला केवळ १२ झेंडे दिसत आहेत. हिंदुत्वाशी गद्दारी करून हे मुख्यमंत्री झाले असून, काही दिवसांनी शिवसेना सत्तेत नसेल, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आरवली (ता. संगमेश्वर) येथील कार्यक्रमादरम्यान केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आयाेजित करण्यात आली आहे. ही यात्रा संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे आल्यानंतर छाेटेखानी कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित हाेते. नारायणे राणे मार्गदर्शन करताना म्हणाले की, जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात मुंबईतून करण्यात आली. ही यात्रा आता काेकणात आली आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलाे आहे. तुमचे आशीर्वाद घेऊन कॅबिनेट मंत्री म्हणून सर्वसामान्य तरुणांच्या हाताला राेजगार मिळवून देणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनेवर जाेरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्यात यांची सत्ता आहे. मात्र, याठिकाणी विराेध करण्यासाठी केवळ १२ झेंडे दिसत आहेत. हीच त्यांची काय ताकद आहे हे कळते. पाेलीस मित्रांनी या सर्वांना वेळीच आवरावे. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले तर यांची पळताभुई थाेडी हाेईल. त्यांना घरी पाठवा नाहीतर आम्ही घरी पाठवू, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.

—————————-

काेकणात नवे उद्याेग उभे करणार

कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्या खात्याचा उपयाेग काेकणाचा कायापालट करणार असल्याचे नारायण राणे म्हणाले. सूक्ष्म व लघु उद्याेग मंत्री म्हणून तरुणांसाठी राेजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. काेकणात नवे उद्याेग उभे करून राेजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

———————————————-

जाेरदार घाेषणाबाजी

आरवली येथील कार्यक्रमादरम्यान नारायण राणेंचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते जमा झाले हाेते. यावेळी शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत जाेरदार घाेषणाबाजी केली. कार्यक्रमादरम्यान काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाेलिसांचे कडे घालण्यात आले हाेते.

Web Title: Shiv Sena will not be in power in a few days: Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.