खेडमधील मनसे, राष्ट्रवादीसह शिवसेना कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:37 AM2021-09-24T04:37:59+5:302021-09-24T04:37:59+5:30

खेड : तालुक्यातील मनसे, राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबई येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री ...

Shiv Sena workers including MNS and NCP in Khed in Congress | खेडमधील मनसे, राष्ट्रवादीसह शिवसेना कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

खेडमधील मनसे, राष्ट्रवादीसह शिवसेना कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

Next

खेड : तालुक्यातील मनसे, राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबई येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री विश्वजीत कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दिल्लीचे आशिष दुवा, माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस ॲड. हुस्नबानू खलिफे, जिल्हा प्रभारी मनोज शिंदे यावेळी उपस्थित होते.

या पक्षप्रवेशाचे नियोजन काँग्रेस तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी केले होते. खतीब यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध राजकीय पक्षात काम करणाऱ्या सुमारे ८० कार्यकर्त्यांनी मुंबई टिळक भवन येथे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यात शिक्षण क्षेत्र व कुणबी समाजातील कार्यकर्ते राष्ट्रवादीचे गणपत धुमक, मनसेचे वाहतूक विभागाचे राज्य सरचिटणीस खलील सुर्वे, मेटे असगणी गावाचे शिवसेनेचे माजी सरपंच शौकत ठाकूर, कुणबी समाजाचे नेते मुरलीधर बुरटे, राष्ट्रवादीचे मंगेश भागवत, होडकाडचे उपसरपंच समीर तांबे, महेश कावणकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आजी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश आहे.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ॲड. खलिफे यांनी या कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा राहील, असे सांगून पक्षवाढीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रदेश चिटणीस अविनाश लाड, जिल्हा उपाध्यक्ष प्रवक्ते अशोक जाधव, राजापूरचे नगराध्यक्ष ॲड. जमिर खलिफे, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष हरीश शेकासन, संदीप धारीया, माजी नगरसेवक बशीर मुजावर, नासिर बडे, अनिल सदरे उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena workers including MNS and NCP in Khed in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.