कुवारबावमध्ये सत्ता परिवर्तन, पोमेंडी, लाजुळमध्ये शिवसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 03:07 PM2019-03-25T15:07:40+5:302019-03-25T15:08:40+5:30
रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेला मात देत कुवारबाव ग्रामविकास आघाडीने १५ पैकी ८ जागा जिंकून सत्ता संपादन केली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेला मात देत कुवारबाव ग्रामविकास आघाडीने १५ पैकी ८ जागा जिंकून सत्ता संपादन केली आहे.
शिवसेनेला ७ जागांवर विजय मिळाला. थेट सरपंच निवडणूकीत आघाडीच्या मंजिरी पाडळकर या १५७१ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. प्रतिस्पर्धी सेनेच्या उमेदवार साधना जांभेकर यांना १४७३ मते मिळाली. लाजुळमध्ये शिवसेनेने पुन्हा सत्ता संपादन केली आहे.
लाजुळमध्ये सेनेचे प्रविण पांचाळ हे थेट सरपंचपदी विजयी झाले. पोमेंडीमध्ये ९ पैकी ५ सदस्य निवड बिनविरोध झाली होती. ४ सदस्य व सरपंचपदासाठी निवडणूक झाली. त्यामध्ये सरपंचपदी शिवसेनेच्या भारती भगवान पिलणकर विजयी झाल्या.