दुकानदार रेशनधान्य देत नाही? बिनधास्त दुकान बदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:21 AM2021-07-09T04:21:21+5:302021-07-09T04:21:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : केंद्र सरकारने ‘एक रेशन एक कार्ड’ ही योजना अख्ख्या देशात राबवायला सुरुवात केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : केंद्र सरकारने ‘एक रेशन एक कार्ड’ ही योजना अख्ख्या देशात राबवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे धान्य आता कुठल्याही दुकानातून खरेदी करण्याची सुविधा शिधापत्रिकाधारकांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रेशन दुकानदाराबद्दल नाराजी असली तरीही आता दुकान बदलण्याची मुभा आहे. पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून कुठेही धान्य घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीअंतर्गत कुणीही उपाशी राहू नये, यासाठी शासनाने पोर्टेबिलिटीची सुविधा शिधापत्रिकाधारकांना दिली आहे. या योजनेचा विशेष उद्देश म्हणजे स्थलांतर करणाऱ्या मजुरांना धान्य कुठल्याही दुकानातून उपलब्ध व्हावे, हा आहे. त्यामुळे स्थलांतर करणारे कामगार किंवा मजूर यांना या सुविधेचा लाभ मिळत आहे. त्याचबरोबर नेहमीचा दुकानदार धान्य देत नाही, अशी तक्रार असलेल्यांनाही दुकान बदलून दुसऱ्या दुकानातून धान्य घेता येणार आहे.
पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ कुठेही घेता येत असल्याने जिल्ह्यातील ५,३२९ कार्डधारकांनी लाभ घेतला आहे.
खेडमध्ये जास्त संख्या
ल्ल खेड तालुक्यात विविध कारणामुळे पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ सर्वाधिक १,७८७ शिधापत्रिकाधारकांनी घेतला आहे.
ल्ल त्याखालोखाल रत्नागिरी तालुक्यात १,३२८ शिधापत्रिकाधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
ल्ल सर्वात कमी संख्या मंडणगड तालुक्यात असून ९२ कार्डधारकांनी लाभ घेतला आहे.
नोव्हेंबरपर्यंत मोफत...
ल्ल केंद्र सरकारने कोरोना संकटाच्या अनुषंगाने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला
ल्ल सुरुवातीला मे आणि जून असे दोन महिने मोफत धान्य मिळणार होते. मात्र आता नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार आहे.
ल्ल या योजनेचा लाभ जिल्ह्यातील पावणेदहा लाख लोकांना मिळत आहे.
किती जणांनी पोर्टेबिलिटीचा लाभ?
मंडणगड ९२
खेड १,७८७
दापोली ५५१
चिपळूण ३४७
गुहागर ५३५
संगमेश्वर १९१
रत्नागिरी १,३२८
लांजा ११५
राजापूर ३८३