पेट्रोलचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:34 AM2021-09-21T04:34:45+5:302021-09-21T04:34:45+5:30
दापोली : दापोलीत चार पेट्रोलपंप आहेत. मात्र काही पेट्रोल कंपनीच्या गाड्या पेट्रोल घेऊन वेळीच न पोहोचल्याने दापोलीतील वाहनचालकांना पेट्रोलचा ...
दापोली : दापोलीत चार पेट्रोलपंप आहेत. मात्र काही पेट्रोल कंपनीच्या गाड्या पेट्रोल घेऊन वेळीच न पोहोचल्याने दापोलीतील वाहनचालकांना पेट्रोलचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे शहरातील एकच पेट्रोल पंप सुरु होता. त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दुपारनंतर वाहनचालकांना पेट्रोल उपलब्ध करुन देण्यात आले.
रस्त्यावर खड्डेच खड्डे
सावर्डे : चिपळूण शहरालगतच्या कळंबस्ते येथील गमरेवाडी क्रमांक ६ कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यातून प्रवास करताना वाहनचालकांबरोबरच ग्रामस्थांनाही अडचणीचे होत आहे. सध्या चिखलाचे साम्राज्य असल्याने रस्त्यावरुन मार्ग काढताना दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वार्षिक सभा उत्साहात
खेड : शहरातील दिवाण दासूर मस्जीद ट्रस्ट कौचाली पटेल मोहल्ल्याची वार्षिक सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. ही सभा सिराज पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी फिरोज ढेणकर, जावेद कौचाली, अब्दुल कौचाली यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पोषण मूल्य दिवस साजरा
दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय पोषण मूल्य दिवस नुकताच साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ. संजय भावे होते. यावेळी विद्यापीठाने विकसित केलेल्या तांबडा भोपळा, घोसाळी, दुधी भोपळा, टोमॅटो, वाली, कारली, माठ आदींची बियाणी तसेच फळ झाडांच्या कलमांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
कर्जदार हवालदिल
मंडणगड : गेल्या पावणेदोन वर्षापासून कोरोनाचे संकट सर्वत्र पसरलेले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर आर्थिक मंदीचे सावट घोंगावत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर व्यवसाय ठप्प झाले आहेत. विविध कारणांनी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यावर होऊ लागले आहेत. बँकेच्या तगाद्यामुळे कर्जदार हवालदिल झाले आहेत.