संपूर्ण विश्व कोरोना महामारीतुन मुक्त करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांकडे प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 07:09 PM2021-04-21T19:09:32+5:302021-04-21T19:13:17+5:30

Ram Navami Ratnagiri : येथील श्रीराम मंदिर संस्थान या सुप्रसिद्ध मंदिरातील जन्मोत्सव सोहळा हा पहाण्यासारखा असतो. मंदिर व मंदिराबाहेरील जागा संपूर्ण श्रीराम भक्तांनी भरलेली असून बाहेर रस्त्यावर पण तितकीच गर्दी असते. या जन्मोत्सवाला शहरातून तसेच बाहेर गावातून अनेक माणसे उपस्थित असतात.

Shri Ram Janmotsav at the historic Shri Ram Temple in Ratnagiri | संपूर्ण विश्व कोरोना महामारीतुन मुक्त करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांकडे प्रार्थना

संपूर्ण विश्व कोरोना महामारीतुन मुक्त करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांकडे प्रार्थना

Next
ठळक मुद्देरत्नागिरीतील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवसंपूर्ण विश्व कोरोना महामारीतुन मुक्त करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांकडे प्रार्थना

रत्नागिरी : येथील श्रीराम मंदिर संस्थान या सुप्रसिद्ध मंदिरातील जन्मोत्सव सोहळा हा पहाण्यासारखा असतो. मंदिर व मंदिराबाहेरील जागा संपूर्ण श्रीराम भक्तांनी भरलेली असून बाहेर रस्त्यावर पण तितकीच गर्दी असते. या जन्मोत्सवाला शहरातून तसेच बाहेर गावातून अनेक माणसे उपस्थित असतात.

गुडीपाडव्या पासून हा उत्सव सुरू होतो, रामनवमी च्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम असतो. हजारो लोक या प्रसादाचा लाभ घेतात, संध्याकाळी सांस्कृतिक किंवा करमणुकीचा कार्यक्रम आटोपल्यावर रात्री लळीताच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होते. असा हा सुप्रसिद्ध ऐतिहासिक सोहळा असतो, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही शासकीय नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून श्रीराम जन्मोत्सव काही ठराविक विश्वस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

प्रभू श्रीरामचंद्रांना आपला महाराष्ट्र, आपला भारत देश आणि हे संपूर्ण विश्व कोरोना या महामारीतुन मुक्त करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली आणि हा सोहळा शासकीय नियमांचे पालन करून संपन्न झाला, अशी माहिती श्रीराम मंदिर संस्थानचे विश्वस्थ आणि खजिनदार संतोष रेडीज यांनी दिली.

Web Title: Shri Ram Janmotsav at the historic Shri Ram Temple in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.