श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे रत्नागिरीमध्ये निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 05:40 PM2018-03-28T17:40:18+5:302018-03-28T17:40:18+5:30
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे गुरूवर्य भिडे गुरूजी सन्मान महामोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरी - संभाजी भिडे गुरूजी यांच्यावरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, या सर्व आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करावी, तसेच हिंदुत्वाचे कार्य करणारे मिलींद एकबोेटे, धनंजय देसाई, विरेंद्र तावडे यांची त्वरीत मुक्तता करावी, या मागणीसाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेतर्फे मारूती मंदिर येथील शिवपुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे गुरूवर्य भिडे गुरूजी सन्मान महामोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजन करण्यात आले होते. मात्र, खेड येथील घटनेमुळे प्रशासनाकडून या मोर्चासाठी परवानगी नाकारण्यात आल्याने मारूती मंदिर येथील शिवपुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी संघटनेच्या मागण्यांचे वाचन करण्यात आले.
भीमा कोरेगाव येथील गोविंद महाराज समाधीजवळ लावलेल्या वादग्रस्त फलकाविषयी सखोल चौकशी व्हावी, सामाजिक अस्वस्थता निर्माण करणारे जिग्नेश मेवाणी, उमर खालीद, अॅड. प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमुर्ती कोळसेपाटील आदींना ताबडतोब अटक करावी, मुंबईतील कोम्बींग आॅपरेशनमध्ये सापडलेल्या चार नक्षलवाद्यांचा दंगलीशी असलेल्या सहभागाचा सरकारने खुलासा करावा, वढू बुद्रुक येथे सापडलेल्या कादीरखान नावाच्या बनावट आधारकार्डचा तपास व्हावा, राहूल फटांगडे या तरूणाच्या खुनाविषयी सखोल तपास करून मारेकºयांवर तत्काळ कारवाई व्हावी, भिडेगुरूजींच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करणाºया महिलेची सखोल चौकशी व्हावी आदी मागण्यांसह संभाजी भिडे गुरूजी यांच्यावरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, या सर्व आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करावी, तसेच हिंदुत्वाचे कार्य करणारे मिलींद एकबोेटे, धनंजय देसाई, विरेंद्र तावडे यांची त्वरीत मुक्तता करावी, या प्रमुख मागणीचा या निवेदनात समावेश आहे.
संघटनेच्या या प्रमुख ११ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना शिष्टमंडळातर्फे देण्यात आले. या शिष्टमंडळात श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे रत्नागिरीचे अध्यक्ष राकेश नलावडे, खेडचे प्रशांत खातू, चिपळूणचे अजिंक्य ओतारी, रत्नागिरीचे ओंकार पुसाळकर, श्रीपाद मराठे यांचा समावेश होता.
या निदर्शनावेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे धारकरी कौस्तुभ सावंत, मुकुंद जोशी, अनिल जठार, सुशिल पवार, अमित चव्हाण, सागर साळवी, शुभम साखरकर, अभिजीत पवार, विनोद केतकर यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्ते उपस्थित होते.