गोगटेच्या विद्यार्थ्यांची कोळंबी संवर्धन, प्रक्रिया उद्योगाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:32 AM2021-03-31T04:32:33+5:302021-03-31T04:32:33+5:30

रत्नागिरी : विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाने अभ्यासक्रमातील घटक भागांचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र ...

Shrimp conservation of Gogte students, visit to processing industry | गोगटेच्या विद्यार्थ्यांची कोळंबी संवर्धन, प्रक्रिया उद्योगाला भेट

गोगटेच्या विद्यार्थ्यांची कोळंबी संवर्धन, प्रक्रिया उद्योगाला भेट

Next

रत्नागिरी : विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाने अभ्यासक्रमातील घटक भागांचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील ‘पदवी आणि पदव्युत्तर’ विद्यार्थ्यांची कोळंबीसंवर्धन आणि प्रक्रिया उद्योग, वरवडे येथे क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.

कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करून या कोळंबी संवर्धनाचे अर्थशास्त्रीय अध्ययन क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात कोळंबी उत्पादनास असलेली मागणी आणि बाजारपेठ, स्थानिक बाजारपेठ व कोळंबी व्यवसायाचे अर्थशास्त्र, कोळंबीसंवर्धन, रोजगाराचे संधी, व्यवस्थापन पद्धती आणि अपेक्षित उत्पादन, कोळंबी संवर्धनाची पूर्वतयारी, संवर्धनक्षम योग्य कोळंबी जातीची निवड, योग्य कोळंबी बीजाची निवड व साठवणूक, पूरक खाद्य व व्यवस्थापन, कोळंबी काढणी आणि व्यवस्थापन, कोळंबी विक्री, निर्यात, मिळणारे उत्पन्न, अशा विविध विषयांची माहिती या क्षेत्रभेटीदरम्यान घेण्यात आली. फिशरीज महाविद्यालयातील शशांक शिंगटे या प्रशिक्षणार्थीने मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, कलाशाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी क्षेत्रभेट नियोजनासाठी मार्गदर्शन केले. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. रामा सरतापे व विभागातील डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. सूर्यकांत माने यांनी क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Shrimp conservation of Gogte students, visit to processing industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.