मालगुंड परिसरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:28 AM2021-04-12T04:28:35+5:302021-04-12T04:28:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गणपतीपुळे : शासनाने विकेंड लॉकडाऊन जाहीर करुन निर्बंध लागू कले आहेत. याला गणपतीपुळे-मालगुंड परिसरात चांगला प्रतिसाद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गणपतीपुळे : शासनाने विकेंड लॉकडाऊन जाहीर करुन निर्बंध लागू कले आहेत. याला गणपतीपुळे-मालगुंड परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. पोलीस पोलीस प्रशासन यांच्याकडूनही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गणपतीपुळे मंदिर व समुद्रकिनारा या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर बॅरेकेट लावून रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता तर आपटा तिठा, कोल्हटकर तिठा या ठिकाणी बॅरेकेटस् लावून ग्रामपंचायत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. पर्यटकांनीसुद्धा गणपतीपुळे परिसराकडे पाठ फिरवली होती. गणपतीपुळे येथील सर्वत्र दुकाने बंद ठेवण्यात आली होती. समुद्र चौपाटीवर ग्रामपंचायतकडून चार जीवरक्षक तसेच पोलीस यांचे पेट्रोलिंग दिवसभर सुरू होते.
मालगुंड बाजारपेठेतील सर्व किराणा तसेच इतर सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे नेहमीच गजबजलेली मालगुंड बाजारपेठ पूर्णपणे शांत होती. किरकोळ प्रमाणात कामावर जाणारे लोक फक्त रस्त्यावर दिसत होते. तसेच किरकोळ स्वरूपात गाड्यांची वर्दळ रस्त्यावर पहावयास मिळत होती. अनेक जण घरात राहूनच सुटीची मजा घेताना दिसत होते.