रत्नागिरीतील कोर्ले येथील सिध्दांतची रणजीच्या संभाव्य संघात निवड
By मेहरून नाकाडे | Published: June 7, 2023 06:52 PM2023-06-07T18:52:19+5:302023-06-07T18:53:30+5:30
रणजी संभाव्य संघात निवड झाल्याबद्दल सिध्दांतवर काैतुकाचा वर्षाव
रत्नागिरी : मुंबई रणजी संघाच्या निवडीसाठी पुढील आठवड्यात निवडपूर्व अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संभाव्या ३५ खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यामध्ये १५ क्रमांकावर जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोर्ले येथील सिध्दांत अधटराव याची निवड झाली आहे. रणजी संभाव्य संघात निवड झाल्याबद्दल सिध्दांतवर सर्वस्तरातून काैतुकाचा वर्षाव होत आहे.
मुंबई रणजी संघासाठी ३५ खेळाडूंची शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामधे भारतीय टिमचे कॅप्टन रोहित शर्मा, आक्रमक खेळाडू सूर्यकुमार यादव याचा समावेश आहे. राजू कुलकर्णी याच्या नेतृत्वाखालील निवड समितीने यांची निवड केली आहे. कोर्ले येथील सिद्वांत अधटराव हा उत्कृष्ठ खेळाडू असून त्याने यापुर्वी चांगला खेळ केला आहे. खेळातील सराव व परिश्रम, आत्मविश्वासाच्या बळावर त्याने संघात जाण्याच्या पहिल्या टप्प्यापर्यंत पोहचण्यात यश मिळविले आहे.
संभाव्य संघात रोहित शर्मा, पृथ्वी साव, यशस्वी जायसवाल, भूपेन लालवानी, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, सर्फराज खान, शिवम दुबे, अरमान जाफर, जयेश पोखरे, प्रणव केला, हार्दिक तमोरे, प्रसाद पवार, सिद्धांत अधटराव, शार्दुल ठाकुर, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रायस्टन डायस, हर्ष तन्ना, शम्स मुलानी, तनुश कोटियन, विजय गोहिल, खिजर दफेदार, परीक्षित वलसांगकर, सिल्वेस्टर डिसूजा, सक्षम झा, अमन खान, साईराज पाटिल, सुजीत नायक, आदित्य धूमल, शशांक अटारडे, आतिफ अत्तरवाला यांचा समावेश आहे.