संदर्भ ग्रंथावर अधिकृततेचा शिक्का

By admin | Published: December 1, 2014 10:35 PM2014-12-01T22:35:09+5:302014-12-02T00:24:11+5:30

शकील गवाणकर : ‘आठवणीतला सहकारा’ला मिळाला आयएसबीएन क्रमांक प्राप्त--संवाद

Signature of the reference library | संदर्भ ग्रंथावर अधिकृततेचा शिक्का

संदर्भ ग्रंथावर अधिकृततेचा शिक्का

Next

सहकार विषयाचा अभ्यास करणाऱ्या, विद्यापीठात शोधनिबंध सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, प्राध्यापकांसाठी अनेक संदर्भ ग्रंथ लागतात. मात्र कल्ल३ी१ल्लं३्रङ्मल्लं’ २३ंल्लंि१ िुङ्मङ्म‘ ल्ल४ेुी१ असलेलीच पुस्तके अधिकृत मानली जातात. हीच आवश्यकता लक्षात घेऊन ‘आठवणीतला सहकार’ या सहकार संदर्भ ग्रंथाची निर्मिती केल्याचे पुस्तकाचे लेखक शकील गवाणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शोधनिबंधासाठी व स्पर्धात्मक परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. सहकार क्षेत्रात कार्यरत असताना संबंधित माहितीचे संकलन केले. शिवाय मान्यवर लेखकांचे निवडक लेखही प्रसिध्द करण्यात आले आहेत. पुस्तक पूर्ण झाल्यानंतर पुस्तकासाठी आयएसबीएन क्रमांकासाठी पुण्यापासून सर्वत्र फिरलो. परंतु याबाबत कोणालाच पूर्ण माहिती नव्हती. अखेर मोबाईलवरून नेटवर सर्च करताना माहिती मिळवली. राजाराम मोहन आयएसबीएनची दिल्ली येथे एजन्सी आहे. कोलकाता येथे विभागीय, तर आंतरराष्ट्रीय कार्यालय लंडनला आहे. संपूर्ण माहिती दिल्लीत पाठवल्यानंतर पुढे कोलकाता व लंडन असा पुस्तकाचा प्रवास झाला. आयएसबीएन क्रमांक मिळण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी जात असल्याचे नमूद करण्यात आले होते. तत्पूर्वी पुस्तकाचे प्रकाशन केले होते. पुस्तकाचा दर्जा व उपयुक्तता पाहूनच आयएसबीएन क्रमांक दिला जातो. त्यानुसार करइठ 978-93-5156-129-1 हा आंतरराष्ट्रीय उच्चत्तम पुस्तक क्रमांक प्राप्त झाला. संबंधित क्रमांक मिळविण्यासाठी परदेशातील लेखकांसाठी शुल्क, तर भारतातील लेखकांना निशुल्क आहे.
कोकणात सहकार न रूजण्यासाठी नियोजनाचा अभाव प्रामुख्याने दिसून येतो. जिल्ह्यात २२०० सहकारी संस्था, ३५ नागरी पतसंस्था, ४ अर्बन बँका आहेत. कर्मचारी पतसंस्था तेवढ्या सुरळीत सुरू आहेत. पशू, दुग्ध, मच्छिसाठी असलेल्या ‘पदुम’ संस्था बंद पडल्या आहेत. जिल्ह्यात ५० मजूर सहकारी संस्था असून, त्याही बंद अवस्थेत आहेत. नागरी बँका, पतसंस्था, विविध कार्यकारी संस्था यांना कर्जवसुली व कलम १०१ डोकेदुखी ठरत आहे. शिवाय सहकारी संस्थांमध्ये चालणारे राजकारण, नेतृत्त्वाचा अभाव, कर्मचारी प्रशिक्षणाचा अभाव यामुळे काही संस्थांची अधोगती सुरू आहे. त्यामुळे त्यांना उपयुक्त ठरणाऱ्या माहितीबरोबर ९७वी घटना दुरूस्ती, जगातील पहिली सहकारी संस्था, भारतातील सहकारी चळवळ, राष्ट्रध्वजाचे महत्व, सुधारित सावकारी कायदा, माहिती अधिकार कायदा, सुधारणा, संकल्प, सरकारी मूल्ये याबाबतची माहिती पुस्तकातून देण्यात आली आहे. गृहनिर्माण सहकारी सोसायटीसाठीही संदर्भ पुस्तक उपयुक्त आहे.
गवाणकर यांच्याशी सहकारविषयक अभ्यासासाठी अनेकवेळा कार्यकर्ते संपर्क साधतात. सहकार क्षेत्रातील बदलाबाबत नवी माहिती मिळवण्यासाठी आतूर झालेल्यांना हा नवा पुस्तक प्रपंच निश्चितच उपयोगी पडेल.
- मेहरून नाकाडे

गेली २१ वर्षे सहकार क्षेत्रात काम केलं. १७ वर्षे कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्गात काम करण्याची संधी मिळाली. सहकार प्रशिक्षक निदेशक म्हणून ग्रामीण भागात पाच वर्षे प्रशिक्षण दिले. जिल्हा सहकारी विकास अधिकारी तद्नंतर १३ प्रशिक्षण केंद्रात प्राध्यापक कार्यरत होतो. पुण्यात उपप्राचार्य म्हणून, तर २००९मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शासनाच्या प्रसिध्दी विभागात हजर झालो. ‘महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह’ व ‘सहकारी महाराष्ट्र’ त्रैमासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहताना सलग दोन वेळा भारतीय राष्ट्रीय संघ, नवी दिल्ली यांचा पुरस्कार मिळाला. २००८ साली औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये ‘सहकाराची वाटचाल’ लघुपटाचा पंतगराव कदम यांच्या हस्ते शुभारंभ झाला. महाराष्ट्र सहकारी संघ सेवकांच्या पतसंस्थेवर संचालक म्हणून निवड झाली. २००६ मध्ये पहिल्यांदा रत्नागिरीला प्रतिनिधीत्व मिळाले. गवाणकर हे सहकार क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ते असून या क्षेत्रातून नवनवीन बदलांचा अभ्यासही कमी केला आहे. या नव्या पुस्तकातून या क्षेत्रातील होणारे बदल व चळवळीला मिळणारे सहकार्य त्यांनी मांडले आहे.

अनुभव विश्व साकारले...
महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह व सहकारी महाराष्ट्राचे संपादन करताना सलग दोन वेळा पुरस्कार.
‘सहकाराची वाटचाल’ लघुपट निर्मिती.
बँकांच्या स्थिती अभ्यासामध्ये रत्नागिरीचा समावेश.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ सेवकांच्या पतसंस्थेवर निवड.
विद्यापीठात शोधनिबंध सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त.
सहकारात नियोजनाचा अभाव.

Web Title: Signature of the reference library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.