सिंगापूरचे भरकटलेले बार्ज रत्नागिरीजवळच्या जयगड समुद्रात?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 11:29 AM2022-07-19T11:29:47+5:302022-07-19T11:32:11+5:30
तालुक्यातील जयगडच्या समुद्रात आज (१९ जुलै) सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले आहे.
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : तालुक्यातील जयगडच्या समुद्रात आज (१९ जुलै) सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले आहे. त्यामुळे समुद्र किनारा परिसरात तेल पसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे बार्ज सिंगापूरचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. वाहून येणाऱ्या कोणत्याही वस्तूंना हात न लावण्याचा सूचना तटरक्षक दलाकडून देण्यात आल्या आहेत. हे बार्ज गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी लागले आहे.
सिंगापूरचे भरकटलेले बार्ज रत्नागिरीजवळच्या जयगड समुद्रात?#ratnagiripic.twitter.com/SbAD93VwQt
— Lokmat (@lokmat) July 19, 2022
जयगड समुद्रात सकाळच्या दरम्यान, सिंगापूर कंपनीचं तेलवाहू बार्ज बुडत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. ही घटना कशामुळे घडली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या बार्जमधील वस्तू किनाऱ्यावर लागण्याची शक्यता असून, त्यातील तेलसाठा पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.