जिल्ह्यातील बारापैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध
By Admin | Published: December 12, 2014 10:40 PM2014-12-12T22:40:22+5:302014-12-12T23:35:53+5:30
उर्वरित सहा ग्रामपंचायतींची होणार २३ रोजी निवडणूक
रत्नागिरी : जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतींत येत्या २३ रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार होती. त्यापैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता उर्वरित सहा ग्रामपंचायतींत निवडणूक होणार
आहे. जानेवारी ते एप्रिल २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, विभाजन होणाऱ्या व नव्याने अस्तित्त्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दापोली, खेड आणि संगमेश्वर या तीन तालुक्यातील एकूण १२ ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणूक होणार होती. मात्र, आता दापोलीतील कात्रण आणि साखरोली, खेडमधील चौगुले मोहल्ला आणि रजवेल तसेच संगमेश्वरमधील कोंड्ये व डावखोल या सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता दापोलीतील पोफळवणे (प्रभाग क्र. १ व ३), शिवाजीनगर (प्रभाग क्र. ३) मध्ये निवडणूक होणार आहे. तसेच खेडमधील बहिरवली (प्रभाग क्र. १ व २), सुकिवली (प्रभाग क्र. १, २, ३) शिर्शी (प्रभाग क्र. १, २, ३) तसेच संगमेश्वरमधील हातीव (प्रभाग क्र. १ व २) या सहा ग्रामपंचायतींत तेरा प्रभागांमध्ये निवडणूक होणार आहे.
दरम्यान, १२ ग्रामपंचायतींसाठी शेवटच्या दिवशी एकूण १५० आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी दापोली तालुक्यातील कात्रण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आलेल्या एकूण १० अर्जांपैकी ५ अर्ज अवैध ठरले असून, उर्वरित १४५ अर्ज वैध ठरले आहेत. ११ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. यादिवशी दापोलीतील ११, खेडमधील १८ आणि संगमेश्वरमधील ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता या तीन तालुक्यात अनुक्रमे १२, ३६ आणि ८ उमेदवार ६ ग्रामपंचायतीतील तेरा प्रभागासाठी लढत देणार आहेत. (प्रतिनिधी)
तालुकाबिनविरोधनिवडणुक असलेली
ग्रामपंचायतग्रामपंचायत
दापोलीकात्रणपोफळवणे
साखळोलीशिवाजीनगर
खेडचौघुलेमोहल्ला सुकिवली
रजवेलबहिरवली
शिर्शी
संगमेश्वरडावखोलहातीव
कोंड्ये
उर्वरित सहा ग्रामपंचायतींची होणार २३ रोजी निवडणूक
जानेवारी ते एप्रिल २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश