गुहागरात बिबट्याच्या नखांची तस्करी, दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 07:25 PM2021-07-07T19:25:01+5:302021-07-07T19:26:17+5:30
leopard Ratnagiri : वाघ आणि बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या दोघांना गुहागर तालुक्यातील मुंढरफाटा येथील स्प्रिंग कंपनीच्या गेटसमोर रंगेहात पकडले. गुहागर पोलीस व रत्नागिरीच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी (७ जुलै) मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. दिलीप सीताराम चाळके (४०) व अक्षय आत्माराम पारधी (२४) अशी दोघांची नावे असून, त्यांच्याकडून १८ वाघांची नखे जप्त करण्यात आली.
गुहागर : वाघ आणि बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या दोघांना गुहागर तालुक्यातील मुंढरफाटा येथील स्प्रिंग कंपनीच्या गेटसमोर रंगेहात पकडले. गुहागर पोलीस व रत्नागिरीच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी (७ जुलै) मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. दिलीप सीताराम चाळके (४०) व अक्षय आत्माराम पारधी (२४) अशी दोघांची नावे असून, त्यांच्याकडून १८ वाघांची नखे जप्त करण्यात आली.
याबाबत रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत मुंढर येथे काहीजण वन्य प्राणी वाघाची नखे विक्रीकरता घेऊन येणार आहेत, अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मुंढर फाटा ते गिमवी या रस्त्यावर दोघेजण संशास्पदरित्या पोलिसांना दिसले. पोलिसांनी दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडील पिशवीत १८ वाघ व बिबट्याची नखे सापडली.
पोलिसांनी दिलीप सीताराम चाळके (४०, रा. मुंढर - चाळकेवाडी, ता. गुहागर) आणि अक्षय आत्माराम पारधी (२४, रा. मुंढर - आमशेत, पेवे, भोईवाडी, ता. गुहागर) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील नखांसह दुचाकी (एमएच १२, इवाय ३२३२) आणि मोबाईल असा ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा कायदेशीर परवाना नसताना आणि स्वतःचे फायद्याकरता विक्री करण्याच्या उद्देशाने आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. या दोघांवर ३९, ४४, ४८, ५१ वन्य जीव प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम करीत आहेत.