Crime News in Ratnagiri: माशाच्या उलटीची तस्करी, खेड पाेलिसांनी तिघांना रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:05 PM2023-01-17T12:05:02+5:302023-01-17T12:05:31+5:30

पाेलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे ठेवली गाेपनीय

Smuggling of fish vomit, Three people were arrested by the khed police | Crime News in Ratnagiri: माशाच्या उलटीची तस्करी, खेड पाेलिसांनी तिघांना रंगेहाथ पकडले

Crime News in Ratnagiri: माशाच्या उलटीची तस्करी, खेड पाेलिसांनी तिघांना रंगेहाथ पकडले

googlenewsNext

खेड : लुप्तप्राय प्रजातीच्या माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) तस्करी करणाऱ्या खेड पाेलिसांनी तिघांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवारी (१५ जानेवारी) राेजी सायंकाळी खेडमधील भरणे नाका येथे करण्यात आली. या कारवाईत पाेलिसांनी दाेन दुचाकीही ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, पाेलिसांनी अटक केलेले हे तिघे परजिल्ह्यातील असून, या तिघांची नावे गाेपनीय ठेवली आहेत.

लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) ची विक्री करण्यासाठी काही जण येणार आहेत, अशी गाेपनीय माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानंतर खेड पोलिस उपनिरीक्षक सुजीत सोनवणे यांनी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, खवटीचे वनरक्षक रानबा बंबर्गेकर यांच्यासह खेड पोलिसांचे एक पथक तयार केले.

या पथकाने महामार्गावरील भरणे नाका येथील साई रिसॉर्टच्या जवळ रविवारी सायंकाळी सापळा रचला. काही वेळाने या ठिकाणी तीन व्यक्ती संशयितरीत्या दोन दुचाकीवरून जात असताना या पथकाने पाहिले. त्यांना थांबवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील एका पिशवीत लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) मिळाली.

पाेलिसांनी अटक केलेल्या तिघांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम २(१६), ३९, ४०(२), ४४(१), ४८(अ) (१), ४९, ४९ (ब), ५१ व ५२ प्रमाणे खेड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील अन्य सहभागी व्यक्तींचा शोध पाेलिसांकडून सुरू आहे.

अत्तर, सुगंधित उत्पादनात वापर

काही दुर्मीळ माशांच्या शरीरातून निघालेला अंबरग्रीस (उलटी) हे औषधी तसेच अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. त्यापासून तयार केलेले अत्तर लाखोंच्या किंमतीने विकले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा स्थिरीकरण द्रव्य म्हणून वापरतात. या उलटीचा वापर करून तयार करण्यात आलेले अत्तर कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकून राहते.

Web Title: Smuggling of fish vomit, Three people were arrested by the khed police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.