सर्प विज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:21 AM2021-06-28T04:21:48+5:302021-06-28T04:21:48+5:30
गूढरम्य गोष्टी या काल्पनिक असतात. ती एक प्रकारची ‘फॅन्टसी’ असते. हे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना कुमारवयात सांगायजला हवे. सर्पमित्रांशी ओळख ठेवावी. ...
गूढरम्य गोष्टी या काल्पनिक असतात. ती एक प्रकारची ‘फॅन्टसी’ असते. हे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना कुमारवयात सांगायजला हवे. सर्पमित्रांशी ओळख ठेवावी. कोणत्याही नागाने किंवा नागिणीने मनुष्यरुप धारण करणे कल्पनाविलास झाला. शास्त्रीय सत्य नाही? घरात साप आल्यास फोन करुन सर्पमित्राला बोलवावे. अज्ञान वाईट. दोन स्पर्धक नाग नर झुंज देत असतील तरी तो नाग-नागिणीचा प्रणय आहे की काय? असा गैरसमज होऊ शकतो. शाळकरी वयात तर आम्हाला भीती घातली जायची की, ‘असले’ काही बघाल तर तुम्हाला अंधत्व येईल. आम्ही मात्र अंधत्वाला न घाबरता मनातील अंधश्रद्धा हळूहळू काढून टाकल्या. तरुण वयातच आपण विज्ञाननिष्ठ झाले पाहिजे. सर्पविज्ञानानेही समजून घेतले पाहिजे. मंत्र टाकून विष कसे उतरणार?
समजा कुणी म्हणाले, साप शीळ घालून झाडावरील चिमण पाखराला भुरळ घालतो, गवतात बोलावतो आणि मग त्याला धरतो तर तो अनुभव आपण स्वत: निरीक्षण करुन घेतला आहे का? ते महत्त्वाचे ठरते. सांगासांगी, वडाला वांगी नको. पुंगीवर नाग डोलत नाही. त्याला ऐकू होत नाही. (श्रवणक्षमता नाही) तो पुंगीची हालचाल पाहून रागाने फणा काढतो. बचावात्मक पवित्रा घेतो, हे माहीत हवे. सर्पमित्रांचे कार्यक्रम प्रत्येक शाळेत व्हायला हवेत. काही ठिकाणी होतही असतात ते महत्त्वाचे!
- माधव गवाणकर, दापाेली