रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी स्नेहा सावंत
By admin | Published: March 21, 2017 11:13 PM2017-03-21T23:13:18+5:302017-03-21T23:13:18+5:30
रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी स्नेहा सावंत
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सेनेच्या स्नेहा सुकांत सावंत, तर उपाध्यक्षपदी सेनेचे संतोष भागोजी थेराडे यांची मंगळवारी निवड झाली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार नेत्रा ठाकूर व उपाध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र आंब्रे यांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. जिल्हा परिषदेच्या ५५ पैकी ३९ जागांवर शिवसेनेने विजय मिळविला होता. त्यामुळे सेनेकडे जिल्हा परिषदेची एकहाती सत्ता आली आहे. अध्यक्षपदासाठी तालुक्या-तालुक्यांमध्ये जी शर्यत होती, त्यात रत्नागिरी तालुक्याने बाजी मारली आहे.
शिवसेनेकडे सत्ता आली तरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी गेल्या काही दिवसांपासून सेनेत जोरदार स्पर्धा सुरू होती. हे पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित असल्याने जिल्हा परिषदेवर सेनेतर्फे निवडून आलेल्या अनेक महिला सदस्यांमध्ये या पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती.
या स्पर्धेत कसबा संगमेश्वर गटातील रचना महाडिक यांचे नाव सर्वांत आघाडीवर होते. तसेच रत्नागिरी व लांजामधून आणखी काही नावे स्पर्धेत होती. रत्नागिरी, संगमेश्वर व लांजा तालुक्यांत जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेला सर्व जागांवर विजय मिळाला. त्यामुळे या तीन
तालुक्यांमध्ये अध्यक्ष पदासाठी स्पर्धा तीव्र होती.