मंडणगड पंचायत समितीपदी स्नेहल सकपाळ सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 03:20 PM2020-10-28T15:20:57+5:302020-10-28T15:22:43+5:30

panchyat samiti, Mandangad Nagar Panchayat, Chiplun, Ratnagiri मंडणगड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या स्नेहल सकपाळ यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी प्रणाली चिले यांची निवड झाली. पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात दिनांक २७ ऑक्टोबर रोजी पीठासन अधिकारी शरद पवार यांच्या अधिपत्याखाली ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, गटविकास अधिकारी एम. दिघे उपस्थित होते.

Snehal Sakpal is the Chairman of Mandangad Panchayat Samiti | मंडणगड पंचायत समितीपदी स्नेहल सकपाळ सभापती

मंडणगड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या स्नेहल सकपाळ यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी प्रणाली चिले यांची निवड झाली.

googlenewsNext
ठळक मुद्देमंडणगड पंचायत समितीपदी स्नेहल सकपाळ सभापती उपसभापतीपदी प्रणाली चिले बिनविरोध

मंडणगड : मंडणगड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या स्नेहल सकपाळ यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी प्रणाली चिले यांची निवड झाली. पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात दिनांक २७ ऑक्टोबर रोजी पीठासन अधिकारी शरद पवार यांच्या अधिपत्याखाली ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, गटविकास अधिकारी एम. दिघे उपस्थित होते.

पंचायत समितीत चारपैकी तीन सदस्य शिवसेनेचे, तर एक सदस्य राष्ट्रवादीचा आहे. शिवसेनेच्या सर्व सदस्यांना संधी मिळावी, यासाठी सभापती व उपसभापती यांनी राजीनामे दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यात शिवसेनेचे आदेश केणे, प्रणाली चिले, स्नेहल सकपाळ यांनी उपस्थित राहून प्रक्रियेत सहभाग नोंदवला. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. यामुळे ही निवड बिनविरोध झाली. शेवटच्या सव्वा वर्षासाठी देव्हारे पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या स्नेहल सकपाळ सभापतीपदी विराजमान झाल्या.

नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा देण्यासाठी तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, संदेश चिले, भगवान घाडगे, शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषदेचे अर्थ आणि शिक्षण सभापती सुनील मोरे, अण्णा कदम, प्रेरणा घोसाळकर, सुरेश दळवी, रामदास रेवाळे, हरिश्चंद्र कोदेरे, दीपक मालुसरे, संजय शेडगे, राजेश भवणे, अमिता शिंदे, शहरप्रमुख विनोद जाधव, सिद्धेश देशपांडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Snehal Sakpal is the Chairman of Mandangad Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.