सचिन शिंदे, शकील मोडक यांची सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:32 AM2021-05-18T04:32:35+5:302021-05-18T04:32:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्याला वादळी वारे आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वीज यंत्रणा वादळाच्या ...

Social Commitment of Sachin Shinde, Shakeel Modak | सचिन शिंदे, शकील मोडक यांची सामाजिक बांधिलकी

सचिन शिंदे, शकील मोडक यांची सामाजिक बांधिलकी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्याला वादळी वारे आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वीज यंत्रणा वादळाच्या तडाख्याने कोलमडली असताना महावितरणच्या टीमने लागलीच भर पावसात कामाला सुरुवात केली. वीज कामगार व अधिकारी याची धडपड जनतेला दिलासा देणारी आहे. वारे, पावसाची तमा न बाळगता वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे व उद्योजक शकील मोडक यांनी पाणी व नाश्ता उपलब्ध करून दिला.

सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने बिस्कीट पुडाही उपलब्ध होत नसल्याने महावितरणचे कर्मचारी उपाशीपोटी कार्यरत होते. नागरिकांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू असलेली धडपड कौतुकापस्पद असली तरी उपाशीपोटी कर्मचारी काम करीत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे आणि उद्योजक शकील मोडक यांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच सकाळी समोसे आणि पाण्याच्या बाटल्या मिळवून कुवारबावपासून मांडवी, शिरगावपर्यंत जागोजागी काम करणाऱ्या वीज कामगारांना पोच केली. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले एका कामाच्या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी रविवारी रात्रभर, पुन्हा सोमवारी सकाळपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

महावितरण कर्मचाऱ्यांना ऊर्जा पुरवणाऱ्या सचिन शिंदे आणि शकील मोडक यांचे वीज कामगारांनी आभार मानले आहेत. नागरिकांचे सहकार्य असेल तर काम करायला आणखी बळ येईल आणि लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

-----------------------

वादळामुळे महावितरणची कोलमडलेली यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी, अधिकारी विशेष परिश्रम घेत आहे. त्यांच्यासाठी राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे व उद्योजक शकील मोडक यांनी सामाजिक बांधिलकी जपत पाणी व नाश्ता उपलब्ध करून दिला.

Web Title: Social Commitment of Sachin Shinde, Shakeel Modak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.