रस्त्यांवर मातीचा भराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:34 AM2021-08-28T04:34:47+5:302021-08-28T04:34:47+5:30
खेड : तालुक्यातील तळवट खेड, तळवट जावळीमध्ये बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नदीपात्राने प्रवाह बदलला आहे. तसेच डोंगराचा भाग खचल्याने मातीचा ...
खेड : तालुक्यातील तळवट खेड, तळवट जावळीमध्ये बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नदीपात्राने प्रवाह बदलला आहे. तसेच डोंगराचा भाग खचल्याने मातीचा भराव साचला आहे. हा भराव काढण्याकडे लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मातीच्या भरावामुळे या वाड्यांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे.
डब्यांची संख्या वाढवली
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या दादर - सावंतवाडी - दादर या तुतारी एक्स्प्रेसमध्ये २४ डबे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीमध्ये आधी १९ डबे होते. त्यात आणखी पाच डब्यांची वाढ होणार आहे. ४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत तुतारी एक्स्प्रेस या वाढीव डब्यांसह धावणार आहे.
कोरोना चाचणी सक्तीची
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाने स्थानिक प्रशासनाकडून वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याविषयी कळविले होते; मात्र जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करुनच महाविद्यालय सुरु करण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ९२ महाविद्यालये सुरु होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी जाणार आहे.
कोरोना लसीकरण
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी ग्रामपंचायतीमध्ये कोरोना प्रतिबंधक विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे हे लसीकरण झाले. गावातील ११० ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला. या मोहिमेत दुसरा डोस असलेल्या ९६ ग्रामस्थांना लाभ देण्यात आला. तसेच तीन दिव्यांगांनाही लस देण्यात आली.
उत्सवात खबरदारी घ्या
रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध उत्सवांवर बंधने आली आहेत. गेल्या काही दिवसात कोरोनावर नियंत्रण येत आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमाही भक्तिभावाने आणि शांततेने साजरी झाली. येत्या मंगळवारी होणारा दहीहंडी उत्सवही नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.