कुठे गाडीतून, कुठे होडीतून...रत्नागिरीत बाप्पा पोहोचले घरोघरी
By मनोज मुळ्ये | Published: September 19, 2023 11:40 AM2023-09-19T11:40:08+5:302023-09-19T11:41:27+5:30
चाकरमानी लाखोंच्या संख्येने गावी दाखल
रत्नागिरी : कोकण आणि गणेशोत्सव हे नाते सर्वाधिक घट्ट. एरवी भाविक मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतात. पण चतुर्थीला मात्र बाप्पा भाविकांच्या घरोघरी जाऊन पाहुणचार घेतात. मंगळवारी बाप्पा कुठे गाडीतून भाविकांच्या घरी गेले. तर रत्नागिरी तालुक्यातील तोणदे येथे बाप्पा होडीतून भाविकांच्या घरी गेले.
कोकणात मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. चाकरमानी लाखोंच्या संख्येने गावी दाखल झाले आहेत. बहुतेक ठिकाणी प्रतिष्ठापना दिनीच बाप्पा घरी आणला जातो. रत्नागिरी जवळच्या तोणदे गावात चक्क होडीतून गणराय घरी गेले. तोणदे आणि हातीस ही गावे काजळी नदीने जोडली जातात.
हातीसमध्ये तयार होणारे गणपती होडीने तोणदे येथे जातात. पूर्वी या गावांमध्ये पुलाची व्यवस्था नव्हती. तेव्हापासून होडीने गणपती तोणदे गावात नेले जात. तीच प्रथा अजूनही कायम आहे. ढोल ताशांच्या गजरात गणराय होडीतून घरोघरी गेले.