गणपतीपुळे परिसरात पेरणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:12+5:302021-06-09T04:39:12+5:30

गणपतीपुळे : येथील पंचक्राेशीत पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीचा पेरणीच्या कामात मग्न असल्याचे दिसून ...

Sowing started in Ganpatipule area | गणपतीपुळे परिसरात पेरणीला सुरुवात

गणपतीपुळे परिसरात पेरणीला सुरुवात

Next

गणपतीपुळे : येथील पंचक्राेशीत पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीचा पेरणीच्या कामात मग्न असल्याचे दिसून येत आहे.

गणपतीपुळे, मालगुंड, निवेंडी, उंडी, खंडाळा, सांबरेवाडी परिसरात गेले दोन दिवस पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. शेतकरी राहिलेल्या पेरण्या तसेच उकल, बेर करण्यावर जोर येऊ लागला आहे. काही ठिकाणी पेरणी केलेली भाताची रोपे दिसू लागली असून जुलै महिन्याच्या पहिल्या पावसात लावणी लावण्यास सुरुवात होईल, असे मत व्यक्त केले जात आहे तर काही शेतकरी आपल्या शेताचे बांध तयार करताना व शेताचे दले साफ करताना दिसत आहे.

सध्या भातशेती करताना नवीन तंत्रज्ञ वापरत असून ट्रॅक्टरचा वापर सध्या कोकणातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ट्रॅक्टरने नांगरणी करत असल्याचे दिसून येत असले तरी अजूनही बैलाचे जोतही पाहावयास मिळत आहे. मालगुंड गावात अजूनही अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात बैलाच्या जोताने शेती करताना दिसत आहेत. या बैलाच्या जोताने शेती करताना दिसत आहे. या बैलाच्या जोताबाबत बोलताना मालगुंड येथील शेतकरी अनंत पात्ये यांनी सांगितले की शेताला नांगराचे फाळ लागणे गरजेचे असून शेतामध्ये ट्रॅक्टरने केलेला चिखल व बैलाच्या जोताने केलेला चिखल भात जमीन अस्मानाचा फरक आहे. या बैलांच्या पायाने होणारा व काळाने होणाऱ्या चिखलामध्ये लावणी लावण्यास अधिक सोपे जाते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Sowing started in Ganpatipule area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.