रामपूर आरोग्य केंद्रासाठी सभापतींनी केली गाडीची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:25 AM2021-05-03T04:25:10+5:302021-05-03T04:25:10+5:30
अडरे : चिपळूण तालुक्यातील रामपूर, खरवते, कापरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सभापती रिया कांबळे यांनी भेट देऊन परिस्थितीचा ...
अडरे : चिपळूण तालुक्यातील रामपूर, खरवते, कापरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सभापती रिया कांबळे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गाडीची व्यवस्था नसल्याची माहिती समोर आली. त्याची दखल घेऊन सभापतींनी रामपूर आरोग्य केंद्रासाठी तात्पुरती भाडेतत्वावर गाडीची व्यवस्था केली आहे.
पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे यांनी ही गाडी मिळण्यासाठी पुढाकार घेतला हाेता. चिपळूण पंचायत समिती सभापती पदाचा कार्यभार काही दिवसांपूर्वी रिया कांबळे यांनी स्वीकारला आहे. त्यानंतर कोविड परिस्थितीला प्राधान्य देत चिपळुणातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. रामपूर, खरवते, कापरे तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन कांबळे यांनी परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी रामपूर आरोग्य केंद्रासाठी गाडीची व्यवस्था नसल्याची माहिती येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली. कोविड परिस्थिती लक्षात घेऊन तत्काळ या आरोग्य केंद्राला महिनाभरासाठी तात्पुरती गाडीची व्यवस्था कांबळे यांनी केली आहे. रामपूर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ गाडीची व्यवस्था केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.