शिक्षण सभापती साेडविणार ‘सुगम-दुर्गम’चा तिढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:59+5:302021-06-22T04:21:59+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात प्राथमिक शाळांमधून निर्माण झालेला ‘सुगम-दुर्गम’चा तिढा सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी पुढाकार ...
रत्नागिरी : जिल्ह्यात प्राथमिक शाळांमधून निर्माण झालेला ‘सुगम-दुर्गम’चा तिढा सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सभापतींकडून सुगम-दुर्गम शाळांचा तिढा लवकरच सोडविला जाणार आहे.
जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शहरांमधूनही वनखात्याने दिलेल्या चुकीच्या प्रमाणपत्रांमुळे सुगम-दुर्गम शाळांचा तिढा निर्माण झाला आहे. हा प्रश्न लवकरच सोडविला जाणार असल्याची माहिती सभापती मणचेकर यांनी दिली. ज्या ठिकाणी वाढ फिरला ती शाळा दुर्गम मानले जाते; परंतु, गेल्या दीड दोन वर्षांपासून बिबट्याने शहरांमधूनही हजेरी लावली आहे. म्हणून त्या शाळा दुर्गम होत नाहीत. काहींनी रत्नागिरीतील नाचणे, कुवारबांव तसेच चिपळूण, खेड आदी भागांतून बिबट्या गेला, त्याच्या बातम्या आल्या म्हणून हा भाग दुर्गम होऊ शकत नाही. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पुन्हा याची छाननी करावी आणि जी गावे खरोखरंच दुर्गम आहेत. त्याचा दुर्गम क्षेत्रामध्ये समावेश करावा, असे सभापतींनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे सुगम-दुर्गमचा लवकरच तिढा सोडविण्यात सभापतींना यश येणार आहे.