सोशल मीडियावर विशेष लक्ष

By admin | Published: September 13, 2014 11:41 PM2014-09-13T23:41:44+5:302014-09-13T23:41:44+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा

Special attention to social media | सोशल मीडियावर विशेष लक्ष

सोशल मीडियावर विशेष लक्ष

Next

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यासह जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक पारदर्शी व्हावी, यासाठी सर्वांनीच आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत केले. या निवडणुकीत सोशल मीडियावर अधिक लक्ष ठेवले जाणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी नंदकुमार जाधव उपस्थित होते. आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही सार्वजनिक, सरकारी, खासगी जागेत छापील, चक्रमुद्रित, टंकलिखित, हस्तलिखित, कागद, पोस्टर्स, नोटीस, पत्रके, आदी लावून विद्रुपीकरण करणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. निवडणूक प्रचार, भूमिपूजन, जाहिराती प्रलोभने, निवडणूकसंबंधी पत्रके, भित्तीपत्रके छपाई, शासकीय वाहने, विश्रामगृह, दूरध्वनी, भ्रमणध्वनी यांचा गैरवापर तसेच कायदा व सुव्यवस्थेत बाधा आणणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच यावेळी सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर अधिक लक्ष ठेवले जाणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
१ जानेवारी २०१४च्या अर्हता दिनांकावर आधारित प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील १२ लाख ३२ हजार ९४६ मतदारांपैकी छायाचित्र मतदार यादीत १२ लाख ०४ हजार ४२ (९७.८४ टक्के) आणि छायाचित्र मतदार ओळखपत्रधारकांची संख्या १२ लाख ०६ हजार ६८ (९८.०१ टक्के) इतकी आहे. मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्यात कुणाचे नाव राहिले असल्यास अथवा बदल करावयाचा असल्यास त्यांनी १७ तारखेपर्यंत जवळच्या मतदान केंद्रावर संपर्क करण्याचे आवाहन यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी नंदकुमार जाधव यांनी केले. यासाठी उद्या (दि. १४) प्रत्येक तहसील स्तरावरील मतदान केंद्रावर विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. तसेच आॅनलाईन पद्धतीनेही बदल करता येतील, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
जिल्ह्यातील १६६६ मतदान केंद्रांवर १८३३ मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी असे एकूण ९३४३ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. / पान ८ वर
यासाठी जिल्ह्यात १६३ झोन स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रसिद्धीला बंदी नाही. मात्र, सोशल मीडियाचा गैरवापर केला जाऊ नये. यासाठी उमेदवारांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून योग्य अधिकाऱ्याची परवानगी घेऊनच प्रसिद्धी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. (प्रतिनिधी)

मतदार संघ मतदार यादीत छायाचित्रओळखपत्र असलेले
असलेले मतदारमतदार
२६३ दापोली २५७५२७ २५७७८१
२६४ गुहागर २२१८५६ २२२०५२
२६५ चिपळूण २४३३१५ २४३७९१
२६६ रत्नागिरी २५५२५२ २५५८२६
२६७ राजापूर २२६०९२ २२६६१८
एकूण १२०४०४२ १२०६०६८
——-
मतदार संघ मतदारएकूण
केंद्र संख्यापुरूष स्त्री
२६३ दापोली ३६०१२३१४११२९२६१
२६४ गुहागर ३१६१०५४५८१२१५०४
२६५ चिपळूण३१८१२११९११२६६२२
२६६ रत्नागिरी३४११२८९०९१३३९८५
२६७ राजापूर ३३२१०६७३५१२६२४०

एकूण १६६७५८५४३४६४७५१२

Web Title: Special attention to social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.