खेर्डी, चिपळूणवासीयांना स्पीड बोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:35 AM2021-09-21T04:35:25+5:302021-09-21T04:35:25+5:30
अडरे : काक या संस्थेच्या माध्यमातून खेर्डी, चिपळूणवासीयांना स्पीड बोट प्राप्त झाली आणि भविष्यात नागरिकांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन ...
अडरे : काक या संस्थेच्या माध्यमातून खेर्डी, चिपळूणवासीयांना स्पीड बोट प्राप्त झाली आणि भविष्यात नागरिकांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी 'काक' या संस्थेच्या माध्यमातून स्पीड बोट मिळवली आहे. तिचा लोकार्पण सोहळा सोमवारी सकाळी आमदार शेखर निकम यांच्या हस्ते प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत झाला. २२ जुलैच्या महापुरात खेर्डीमध्ये अनेक तरुणांनी जनतेचे प्राण वाचवण्यात मोठे योगदान दिले. रिक्षाचे टप, टायर ट्यूब, रिकामे ड्रम अशी साधने घेऊन हे मदतकार्य झाले. मात्र, आता काक या संस्थेच्या माध्यमातून खेर्डी, चिपळूणवासीयांना स्पीड बोट मिळाली. त्यामुळे भविष्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे सांगतानाच आमदार निकम यांनी अशी कोणतीही परिस्थिती यापुढे उद्भवू नये, अशी इच्छाही व्यक्त केली.
स्पीड बोट लोकार्पण सोहळ्याला वेळी जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, ग्रामपंचायत सदस्य राकेश दाभोळकर, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, रियाज खेरडकर, विनोद भुरण, अभिजीत खताते, उमेश खताते, बाळा दाते, ओमकार मोरे, सतीश पंडित, मंगेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.