कोरोना चाचणीसाठी बाेंड्ये नारशिंगे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:25+5:302021-06-22T04:21:25+5:30
रत्नागिरी : सध्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आवश्यक ...
रत्नागिरी : सध्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांची कोविड चाचणी करणे अत्यावश्यक आहे. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागामार्फत ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोरोना चाचणीला ग्रुप ग्रामपंचायत बोंडये नारशिंगे (ता. रत्नागिरी) येथील ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी सरपंच सुहानी कुळये, उपसरपंच महेश देसाई, छावा प्रतिष्ठान, रत्नागिरीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सुनील धावडे, ग्रामसेवक सोनकांबळे, डेटा ऑपरेटर समीर गोताड, पोलीसपाटील प्रवीण कांबळे, बोंडे पोलीसपाटील विशाखा पानगले, वीणा पानगले, अंजली आग्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, जाकादेवीचे कर्मचारी आशा इंदुलकर, अंगणवाडी सेविका सुप्रिया कांबळे, युवराज कांबळे, प्रवीण रोडे, वसंत कांबळे, गणपत कांबळे, अर्जुन कांबळे, श्रीपत गोताड, पांडुरंग कांबळे, अमोल कांबळे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.